पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या प्रलंबित कामाबाबत स्थायी समितीच्या सभापतींनी दिले हे निर्देश 

पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या प्रलंबित कामाबाबत स्थायी समितीच्या सभापतींनी दिले हे निर्देश 

भोसरी :  पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील नियोजित क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित दृक-श्राव्य प्रदर्शन केंद्र, मध्यवर्ती ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह, महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व संगणक साक्षरता वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र आदींची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     
            
लॅाकडाउनमुळे  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम थाबले होते. मात्र, आता लॅाकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या प्रलंबित कामाची पाहणी स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. या वेळी नगरसेवक विकास डोळस, कार्यकारी अभियंता दिलीप पवार, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, काळुराम गायकवाड, हनुमंत माळी, पी. के. महाजन, कविता खराडे, गिरीष वाघमारे, संतोष जोगदंड आदींसह महापालिका अधिकारी उपस्थित होते.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील गांधीनगरमध्ये बांधण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले स्मारक इमारतीचे उद्घाटन ३ जानेवारी २०१८ रोजी झाले होते. परंतु, स्मारक इमारतीमध्ये महापालिकेचे काही विभाग कार्यरत असल्याने या स्मारकातील कामे प्रलंबित होती. स्मारकातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समितीचे मुख्य समन्वयक मानव कांबळे यांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यामुळे स्मारकात महापालिकेची सुरू असलेली अन्य कार्यालये या स्मारकातून इतरत्र हलविण्यात आली. त्यामुळे स्मारकाच्या प्रलंबित कामाचा मार्ग मोकळा झाला होता. या स्मारकात नियोजित महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित दृक-श्राव्य प्रदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेचे मध्यवर्ती ग्रंथालयही येथे सुरू होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विविध कार्यक्रमांसाठी बहुउद्देशीय सभागृहबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व संगणक साक्षरता वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र आदी केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. सध्या या केद्रांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या गेल्या आठवड्यातील झालेल्या सभेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाशेजारी असणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासही मंजूरी देण्यात आली आहे. 

पावणे दोनशे वर्षांपूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या सहकार्याने महिलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले स्मारकाद्वारे महिलांना प्रशिक्षणाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येतील. 

- संतोष लोंढे, सभापती, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com