पिंपरी : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव जाणारी मोटार थांबविल्याने दोघांनी ड्युटीवरील पोलिसाला शिवीगाळ केली. काळेवाडी येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बालाजी संतराम वालेकर (वय 24, रा. आझाद कॉलनी, पाचपीर चौक, काळेवाडी), तुषार लहू कोकणे (वय 28, रा. कोकणेनगर, काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विक्रांत चिंतामण चव्हाण (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
फिर्यादी हे वाकड पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असून रविवारी (ता.13) काळेवाडीतील भारतमाता चौक ते तापकीर मळा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी एका मोटारीतून भरधाव जात असल्याने फिर्यादी यांनी त्यांची मोटार थांबविली. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत शांततेचा भंग केला. तसेच सरकारी काम करण्यास अडथळा निर्माण केल्याने आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Corona Updates: पुण्यात हॉस्पिटलमधील रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या आत