esakal | आंतरजातीय-धर्मीय विवाहितांचा आकुर्डीतील बुद्ध विहारात सत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरजातीय-धर्मीय विवाहितांचा आकुर्डीतील बुद्ध विहारात सत्कार

आंतरजातीय-धर्मीय विवाहितांचा आकुर्डीतील बुद्ध विहारात सत्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आकुर्डी येथील तक्षशिला बुद्ध विहारात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आंतरजातीय-धर्मीय विवाहितांचा सत्कार सन्मान रविवारी (ता.५) करण्यात आला. आंतरजातीय विवाह सन्मान समारंभात अमृता भोसले -आशिष वानखेडे, गिता हरावडे-रवी भिसे, ज्योती डखरे-अभय लांडगे, पूजा कलवले-अजिंक्य सांडभोर, रेणुका बनसोडे-ईश्‍वर राठोड, अश्विनी सूर्यवंशी-गोपीनाथ गायकवाड, शहेनाज कुरणे-राधेश्याम धाडगे, दिव्या वाघमोडे-रियाझ शेख, रूपाली बोरकर-दर्शन देवकांत या जोडप्यांचा ट्रॉफी, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अंनिसचे अध्यक्ष डॉ. योगेश गाडेकर, ॲड. मनीषा महाजन, ॲड. रमेश महाजन, अरुणा यशवंते, संजय बारी, ॲड. भूषण महाजन, वनिता फाळके, विशाल विमल, प्रताप सोनवणे, मंगला मुनेश्‍वर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांबळे यांनी जोडप्यांचे स्वागत केले.

सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले, ‘‘सहजातीय-धर्मीय लग्न ही अनेकदा मुलामुलींच्या इच्छे व्यतिरिक्त लावली जातात आणि हा हजारो वर्षांपासून सुरू असलेला रिवाज आहे. त्यामुळे आंतरजातीय लग्न केली तर धर्म भ्रष्ट होईल, असे म्हटले जाते, म्हणजे धर्म काही इतकी तकलादू गोष्ट आहे का ? मानव जात हीच एक असून ती समान आहे, असे महामानवांनी सांगितले आहे.

आंतरजातीय धर्मीय विवाह केल्यास जीवे मारले जाते, जातीचे प्रमुख दबाव आणतात. आंतरजातीय लग्न ठरवून होतील तेव्हा समाजपरिवर्तन होईल आणि जातीयद्वेष कमी होण्यास सुरुवात होईल. स्वतः ला परिवर्तनवादी समजणारे अनेक लोकही अशा विवाहाच्या मागे उभे राहत नाहीत.’’ क्रांती दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. नितीन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

loading image
go to top