समर युथ समिट २०२४ ची तरुणांमध्ये उत्सुकता

समर युथ समिट २०२४ ची तरुणांमध्ये उत्सुकता

पिंपरी ता. २ : आर्थिक उन्नतीचे ज्ञान, सामाजिक जाणीव आणि देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी ‘यिन’च्यावतीने आयोजित तरुणाईच्या उत्सवाची अर्थात ‘समर युथ समिट २०२४’ची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. या समिटसाठी राज्यातील हजारोंच्या संख्येने तरुणाई ११ जून २०२४ रोजी पुण्यात दाखल होणार आहे. हे विद्यार्थी एकत्र येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर विचार मंथन करणार आहेत.
‘यिन’ने राज्यातील तरुणाईला विधायक दिशा दाखविण्यासाठी संघटन उभे केले आहे. त्यामध्ये काम करणारी तरुणाई दरवर्षी अनेक उपक्रमांत सहभागी होत असते. या अनेक उपक्रमांमध्ये ‘समर युथ समिट’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
आजपर्यंत विविध क्षेत्रांत अनेक मान्यवरांना मिळवलेल्या यशाचे गमक ते सहभागी तरुणाईसमोर ठेवणार आहेत. स्वतः मधील कलाकौशल्य ओळखून त्यात कसे काम करावे, आत्ता मी कुठे आहे, मला काय करायला हवे, समस्येला तोंड कसे द्यावे, सकारात्मकता कशी वाढवावी, सध्या आणि नंतर बाजारपेठेत कशाला मागणी असेल, संधीची वाट पाहण्यापेक्षा - संधी निर्माण कशी करावी, मुलाखतीला कसे सामोरे जावे, अशा तरुणाईच्या मनातील अनेक प्रश्नांवर ज्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.
समर युथ समिट २०२४ चे पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, असोसिएट स्पॉन्सर ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल आणि महाएनजीओ फेडरेशन हे प्रायोजक आहेत. या कार्यक्रमाच्या काहीच जागा शिल्लक असल्याने ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदवायचा आहे, त्यांना सोबत दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाइन अॅपद्वारे नावनोंदणी करीत येईल. अधिक माहितीसाठी : यिन अधिकारी अक्षय बर्गे : मो.नं.८३२९०६१८३०.

‘सकाळ’ यिन हा उपक्रम एक अतिशय उत्तम आणि तरुणांना स्फूर्ती देणारा आहे. एसबीपीआयएम या उपक्रमाशी जवळून जोडले गेलेले आहे. व्यवस्थापन कौशल्य हे औद्योगिक क्षेत्रात अत्यंत गरजेचे असते. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्याची मुख्य भूमिका आहे. यिनचे व्यासपीठ हे कौशल्य वाढविण्यात मदत करते. ‘सकाळ’च्या समर युथ समिटला खूप शुभेच्छा.
- डॉ. कीर्ती धारवाडकर, संचालिका, एसबीपीआयएम

आमचे महाविद्यालय पहिल्यांदाच ‘सकाळ’ यिन आयोजित समर युथ समिटमध्ये सहभाग घेत आहे. समर युथ समिटसाठी जवळपास ३० विद्यार्थ्यांची नोंदणी आत्तापर्यंत झालेली आहे. अजूनही अनेक विद्यार्थी समीटसाठी इच्छुक आहेत. आम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा नवीन अनुभवासाठी समर युथ समिटमध्ये सहभाग नोंदवत आहोत.
- आदेश पोखरकर, यिन अध्यक्ष, इंद्रायणी महाविद्यालय

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘समर युथ समिट’ हे पुण्यात होत आहे. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातून युवकांचा प्रतिसाद लाभत आहे. ‘यिन’ उपमुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केले आहे. यावेळी ‘यिन’ पिंपरी-चिंचवड टीम मान्यवरांच्या व युवकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
- युवराज चव्हाण, ‘यिन’ उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

युवकांना विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचे विचार एकाच व्यासपीठावर ऐकण्याची उत्तम संधी या समिटमध्ये मिळणार आहे. त्याने भविष्यात युवकांचे नेतृत्व प्रगल्भ होण्यास नक्कीच मदत होईल. ‘यिन समर युथ समिट २०२४’ ला शुभेच्छा.
- डॉ. सोहन चितलांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.डी.वाय. युनिटेक सोसायटी, पिंपरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com