पिंपरी : पालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदारी वाटपात नगरसेवकांचा इंटरेस्ट

टीम ई-सकाळ
Thursday, 18 June 2020

- कोणता विभाग कोणाकडे द्यावा, यासाठी आयुक्तांकडे पत्रकबाजी

पिंपरी  : पिंपरी चिंचवड महापालिका. शहराचा प्रशासकीय कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था. आयुक्त श्रावण हर्डीकर हे मुख्य प्रशासकीय अधिकारी. त्यांच्या नंतर तीन अधिकारी आहेत. अतिरिक्त आयुक्त. कामकाजाच्या सोयीसाठी त्यांच्यात विविध विभागांचे वाटप दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी केले आहे. मात्र, विभाग वाटप कसे चुकीचे आहे, हे दाखवून देत, कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणता विभाग द्यावा किंवा द्यायला हवा होता, अशी सूचना वजा विनंती इंटरेस्टेड नगरसेवक आयुक्तांकडे करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

महापालिकेत सध्या अतिरिक्त आयुक्त दर्जाची तीन पद सरकारकडून मंजूर आहेत. एक नंबर पदाला संतोष पाटील यांची नियुक्ती झाली आहे. दोन क्रमांकाच्या पदावर अजित पवार कार्यरत आहेत. हे दोन्ही अधिकारी शासन नियुक्त आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाच्या पदावर गेल्या आठवड्यात प्रविण तुपे यांची नियुक्ती आयुक्तांनी केली आहे. ते महापालिका सेवेत असून सहशहर अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाचा तात्पुरता कारभार सोपविला आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारकडून मंजूर तिन्ही अतिरिक्त आयुक्त पदावर अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे कामकाजाच्या सोयीसाठी त्यांच्यात विविध विभागांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु, सेवेत कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे जास्त व महत्त्वाचे विषय दिले आहेत. हे चुकीचे आहे. अमूक विभाग या अधिकाऱ्याकडे असायला हवा होता, अशी सूचना वजा मागणी नगरसेविकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कडे केली आहे. या मागील कारणे आणि गणिते वेगळीच आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interest of corporators in allocating responsibilities of additional commissioners in pimpri