Pimpri : खंडित वीजपुरवठ्यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online education
खंडित वीजपुरवठ्यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळा

खंडित वीजपुरवठ्यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळा

पिंपरी : भोसरी येथील अराईज स्कूल परिसरात महावितरणकडून खड्डे खोदून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शाळेत ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याच्या तक्रारी शिक्षक व पालकांनी केल्या आहेत. सतत वीज जात असल्याने लॅपटॉप आणि मोबाईल डिस्चार्ज होत असल्याने शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोरोनामुळे शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे पण भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. त्यामुळे दर तासाला सतत वीज खंडित होण्याचा प्रकार सुरु आहे. खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे तसेच वातावरणात मोठ्या प्रमाणात असलेल्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या उकाड्यास नागरिक वैतागले आहे. दुसरीकडे शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण देण्यास अडचणी येत आहे. वीज नसल्यामुळे लॅपटॉप आणि मोबाईल डिस्चार्ज होत आहेत. सगळा ऑनलाइन क्लासचा खेळ खंडोबा होत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. तसेच पाणी पुरवठा झालेला नाही. स्वच्छतागृहात पाणी नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत महावितरणकडून काहीही उत्तर देता आले नाही. त्यामुळे वीजपुरवठा नियमित करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

loading image
go to top