
IT Sector
sakal
अश्विनी पवार
पिंपरी : अमेरिकेने बदललेल्या धोरणांमुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र ढवळून निघाले आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचारी भरती थांबविली आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांनाही कमी केले जात आहे. मात्र, याला ‘कॉस्ट कटिंग’चे नाव न देता विविध मार्गांचा अवलंब या कंपन्या करत असल्याचे समोर आले आहे.