रस्त्याने चालणंही धोक्याचं? कोयत्याचा धाक दाखवून लुटला ऐवज

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 21 November 2020

रस्त्याने पायी जाणाऱ्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांच्याकडील ऐवज लुटला.

पिंपरी-  रस्त्याने पायी जाणाऱ्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांच्याकडील ऐवज लुटला. ही घटना चिखलीतील चिखली-मोशी रोडवर घडली. याप्रकरणी ईरसाद उर्फ वारीसअली मजीद चौधरी (रा. अक्‍सा एम्पायर बिल्डिंग ए-विंग, चिखली-मोशी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सर्वात मोठा दरोडा : फक्त दहा मिनिटांत लुटले, 11 कोटी रुपये

गुरूवारी (ता.19) रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र इब्राहिम चौधरी हे चिखली-मोशी रोडने कामावर जात होते. त्यावेळी दोन दुचाकींवरून चौघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने कोयत्याचा धाक दाखवून तर दुसऱ्याने फिर्यादीची गचांडी पकडून त्यांच्या खिशातील मोबाईल व दोन हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is it dangerous to walk on the road Looted by strangers