
IT Job Scam
Sakal
पिंपरी : ‘‘आमच्याकडे इतके लाख रुपये भरा, तुम्हाला प्रशिक्षण मिळेल, मग नोकरी सुद्धा लावू,’’ अशी आश्वासने देऊन हिंजवडीतील एका कंपनीने शेकडो आयटी अभियंत्यांना लाखो रुपयांना गंडा घातला. एका आयटी अभियंत्याने फिर्याद दाखल करण्याचे धाडस दाखविल्याने या प्रकाराला वाचा फुटली. यात तब्बल चारशेपेक्षा जास्त तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय घडामोडींमुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या असून असुरक्षितता वाढीस लागल्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत.