पिंपरी - गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसाने हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सायंकाळी कार्यालयातून अगदी काही मिनिटांपर्यंत असणाऱ्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आयटीयन्सना तास न् तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा द्यावी, अशी मागणी आयटीयन्स कडून केली जात आहे.