
पिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प सुरू होण्यास २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या या प्रकल्पाचे ८५ टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. मात्र, घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी आवश्यक ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’चे काम अद्यापही सुरू झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मेट्रो सुरू झाली, तरी स्टेशनपर्यंत पोचणार कसे? हा प्रश्न ‘आयटीयन्स’ अर्थात आयटी कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.