Pimpri ; ‘आयटीआय’च्या मुली बनणार ‘वॉटर एक्स्पर्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iti

‘आयटीआय’च्या मुली बनणार ‘वॉटर एक्स्पर्ट’

पिंपरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात महिला सक्षमीकरणाअंतर्गत वॉश कंपनीच्यावतीने महिलांना मोफत ‘वॉटर एक्स्पर्ट’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत १०० मुली पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून नळदुरुस्तीचे काम करताना दिसणार आहेत.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्लंबिंग ट्रेनिंग सेंटर’ मध्ये वॉश कंपनीच्यावतीने सीएसआर फंडातून महिला सक्षमीकरणा अंतर्गत व वॉश कंपनीला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने, १०० महिलांना विनामूल्य तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने ४५ मुलींच्या बॅचचे उद्‍घाटन करण्यात आले. आयटीआयच्या ट्रेडमध्ये मुलींना ३० टक्के आरक्षण आहे. मात्र मुलांच्या प्लंबिंग ट्रेडमध्ये मुलींनी रस दाखवला तर मुलीदेखील नळदुरुस्ती करताना दिसतील.

या कंपनीकडून मुलींना ५ हजार रुपये स्टॅयपॅन्ड मिळणार आहे. यावेळी व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक यतीन पारगावकर, वॉश कंपनीचे विभागीय अध्यक्ष अविनाश चिंतावार, वॉश कंपनीचे वरिष्ठ मॅनेजर मोहन पाटील, रोटरी क्लबचे श्‍याम आगरवाल, महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे दीपक दहिया, प्राचार्य शशिकांत साबळे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार डी. एन. गरदडे, मोहन पाटील, गटनिदेशक कमलेश पवार, अजय अखरे, एस.आर. खुडे, अविनाश पटेल आदी उपस्‍थित होते. मोहन पाटील यांनी प्रास्ताविकात कंपनीची वाटचालीची माहिती दिली.

वॉश कंपनीच्या माध्यमातून मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच महिला सक्षमीकरण हे शासनाचे धोरण प्रत्यक्षात उतरताना दिसणार आहे. मुलींनी पायावर उभे राहण्याची गरज आहे. काळाची गरज ओळखून मुलींनी धाडस दाखवून ‘वॉटर एक्स्पर्ट’ बनावे.

- यतीन पारगावकर,

सहसंचालक, व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय

loading image
go to top