जागतिक मराठी संमेलनात शरद पवारांनी घेतली आयोजकांची फिरकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jagtik marathi sammelan Sharad Pawar mohan agashe Pramod Chaudhary

जागतिक मराठी संमेलनात शरद पवारांनी घेतली आयोजकांची फिरकी

संत तुकारामनगर पिंपरी येथे डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहात १८ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्राज उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांचा या संमेलनाचे उद्घाटक पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जागतिक मराठी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

त्यानंतर मराठी सिने अभिनेते मोहन आगाशे यांच्या पुरस्काराची वेळ आली. शरद पवारांनी त्यांना जागतिक मराठी गौरव पुरस्कार प्रदान केला. पुरस्काराची रक्कम चेकच्या स्वरूपात असल्याने आयोजकांनी त्यांच्या हातात चेक असलेला लिफाफा दिला.

यावेळी शरद पवारांनी तो लिफाफा मोहन आगाशेंच्या हातात देण्याच्या आधी स्वतः तो लिफाफा उघडून नक्की त्याच्यात चेक आहे का नाही? का नुसता कोरा लिफाफा आहे याची खातरजमा केली.

जेव्हा त्यात चेक खरोखरच आहे असे त्यांनी पाहिल्यावर स्वतः शरद पवारांनी हसत तो चेक मोहन आगाशे यांना प्रदान केला. यावेळी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हशा पिकला. याच छायाचित्रांची ही झलक.

- संतोष हांडे