Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो उद्या पाळा 'जनता कर्फ्यू'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महापौर उषा ढोरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन

पिंपरी  : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांनी रविवारी (ता. 5) जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. तसेच, उद्यापासून आठवड्यात दर रविवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये बाधितांचा आकडा आज दोनशे पार, तर एवढ्या जणांचे मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये रविवार आणि गुरुवार या दोन दिवशी जनता कर्फ्यू लावण्याची सूचना महापौर उषा ढोरे व महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिली होती. त्यानुसार आयुक्त हर्डीकर व महापौर ढोरे यांनी उद्या रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. दरम्यान, रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याबाबतचा निर्णय शनिवारी रात्री आठ नंतर घेतल्याने त्याच्या पालनाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू आवश्यक असून पिंपरी चिंचवडकरांनी याची दखल घ्यावी. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता जनता कर्फ्युला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janata curfew every sunday and thursday in pimpri chinchwad