‘जेईई’, ‘नीट’बाबत रविवारी चिंचवडमध्ये मार्गदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal vidya

तुम्ही दहावीत गेलाय किंवा आता दहावीची परीक्षा दिलीय. पुढे काय करायचं?, करियरच्या संधी काय आहेत? उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे? याबाबत मनात असंख्य प्रश्न आहेत.

JEE NEET : ‘जेईई’, ‘नीट’बाबत रविवारी चिंचवडमध्ये मार्गदर्शनाचे आयोजन

पिंपरी - तुम्ही दहावीत गेलाय किंवा आता दहावीची परीक्षा दिलीय. पुढे काय करायचं?, करियरच्या संधी काय आहेत? उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे? याबाबत मनात असंख्य प्रश्न आहेत. त्याबाबत माहिती हवीय. त्यासाठी पालकांनाही सोबत आणायची तयारी आहे. तर, मग रविवारपर्यंत थांबा. कारण, रविवारी (ता. २) तुमच्यासाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केले आहे.

‘विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करिअरच्या संधी’ याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश अर्थात ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. दहावीची परीक्षा संपली आहे. काही जण दहावीत जाणार आहेत. पण, दहावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यायचे. कोणती विद्या शाखा निवडायची. इंजिनिअरिंग करायचे की मेडिकलला जायचे. याबाबत अनेकांच्या मनात अनेक शंका असतील. प्रश्न असतील. त्यांचे निरसन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि पेस आयआयटी ॲंड मेडिकल (प्रोफेशनल ॲकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झॅमिनेशन) यांच्यातर्फे ‘करिअर निवड’ विषयावर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहेत.

सेमिनारमध्ये काय?

विज्ञान क्षेत्रातील शिक्षण व करिअरच्या संधी

दहावीतील व दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन

जेईई व नीट परीक्षांचे महत्त्व, त्यांचा सराव कसा करावा

मुलांच्या करिअरबाबत पालकांची भूमिका

काय? कधी? केव्हा? कुठे?

काय? - दहावीनंतर करिअर निवड मार्गदर्शन

कधी? - रविवार, ता. २ एप्रिल २०२३,

केव्हा? - सकाळी १० वाजता

कुठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

प्रवेश - विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य