esakal | खरेदीच्या बहाण्याने आली अन् सोन्याचे दागिने चोरून लंपास झाली
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदीच्या बहाण्याने आली अन् सोन्याचे दागिने चोरून लंपास झाली
  • पिंपळे गुरव येथे ही घटना घडली. 

खरेदीच्या बहाण्याने आली अन् सोन्याचे दागिने चोरून लंपास झाली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या महिलेने दुकानातील पाऊण लाखाचे दागिने लंपास केले. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नारायणलाल राजारामजी माली (रा. शिवसागर बिल्डिंग, विनायकनगर, पिंपळेगुरव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात ज्वेलर्सचे दुकान आहे. एक अनोळखी महिला सोन्याच्या चमक्‍या खरेदी करण्याच्या बहाण्याने या दुकानात आली. फिर्यादी यांची नजर चुकवून आरोपी महिलेने 70 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्‍यांची दोन पाकिटे चोरून नेली. त्यामध्ये वेगवेगळया आकाराच्या 45 सोन्याच्या चमक्‍या होत्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सांगवी पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने संबंधित महिलेची ओळख पटवित असून, परिसरातही चौकशी केली जात आहे. 
दिवाळीमुळे ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये गर्दी असल्याने चोरट्या महिला या गर्दीचा गैरफायदा घेत दुकानमालकांची नजर चुकवून चोऱ्या करीत असल्याचे समोर येत आहे.