esakal | पिंपरी : शहरातील विधवांसाठी तीन महिन्यांत 'जॉब फेअर'
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad Municipal Corporation

पिंपरी : शहरातील विधवांसाठी तीन महिन्यांत 'जॉब फेअर'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘कोरोनामुळे कर्त्या व्यक्तीची निधन झालेल्या कुटुंबांना सावरण्यासाठी महापालिकेने ‘उमेद जागर’ उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत येत्या तीन महिन्यांत विधवांसाठी उद्योगांच्या माध्यमातून ‘जॉब फेअर’ व पतीच्या नावावरील घर महिलेच्या नावावर करण्यासाठी महापालिका पुढाकार घेणार आहे. घरनोंदणीसाठी महापालिका मेळावे घेणार आहे. यासाठी प्रसंगी पोलिसांची मदतदेखील घेतली जाईल,’’ असे महपालिका उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.

कोरोनामुळे विधवा झालेल्यांसाठी महापालिका ‘उमेद जागर’ उपक्रम राबवत आहे. त्याअंतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमात चारठाणकर बोलत होते. अ प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, नगरसेविका अनुराधा गोरखे, वायसीएममधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्मिता पानसे आदी उपस्थित होते.

चारठाणकर म्हणाले, ‘‘कोरोनामुळे अनेक कुटुंबांपुढे संकटे उभी राहिली आहेत. ते दूर करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. विधवांना बळकटी देण्यासाठी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. महापालिका नागरवस्ती विभागाच्या शंभरपेक्षा जास्त योजना आहेत. त्यामाध्यमातून अर्थसाह्य मिळून अनेकांच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळणार आहे. विधवांच्या अर्थसहाय्यात २५ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.’’

loading image
go to top