Sudhanshu Trivedi : छावा युवा मराठा महासंघाच्यावतीने जोडे मारो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jode Maro Andolan of Chhawa Yuva Maratha Governor Koshyari BJP Sudhanshu Trivedi protested politics

Sudhanshu Trivedi : छावा युवा मराठा महासंघाच्यावतीने जोडे मारो आंदोलन

पिंपरी : अखंड देशाचे श्रद्धास्थान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांच्या बाबतीत वारंवार आक्षेपार्ह आणि चुकीचे विधाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या कडून केले जात आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनीही खोटी माहिती प्रसार माध्यमांसमोर देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे. यांच्या प्रतिमेस छावा मराठा युवा महासंघाच्यावतीने थेरगांव येथे जोडे मारुन निषेध आंदोलन नुकतेच करण्यात आले.

यावेळी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटातून सुद्धा खोटा इतिहास आणि चुकीचे ऐतिहासिक दाखले देण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न करणारे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांचाही निषेध करण्यात आला. छावाचे संस्थापक-अध्यक्ष धनाजी येळकर पाटील म्हणाले की, संविधानिक पदाच्या आडून शिवाजी महाराज यांचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य वारंवार करून आमच्या आस्मितेवर घाला घातला जाणार असेल तर यापुढे सहन केले जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल.

आंदोलनास छावाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब पाटील, संपर्क प्रमुख गणेश सरकटे, गणेश भांडवलकर, मराठा सेवा संघाचे उद्योग विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, संजय जाधव, अपणा वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख, हमीद शेख, किशोर आट्टर्गेकर, सतीश नारखेडे, मोईन शेख, जगन्नाथ यादव, निखिल गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.