esakal | भोसरीतील विद्युत रोहित्राच्या स्फोटानंतर महापालिकेने घेतला 'हा' निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीतील विद्युत रोहित्राच्या स्फोटानंतर महापालिकेने घेतला 'हा' निर्णय
  • महापालिका व महावितरण अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय 

भोसरीतील विद्युत रोहित्राच्या स्फोटानंतर महापालिकेने घेतला 'हा' निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : विजेचा झटका बसून किंवा रोहित्राचा स्फोट होऊन इंद्रायणीनगरसारखी जीवित हानी होऊ नये, यासाठी महापालिका व महावितरण अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा. त्यासाठी प्रभागानुसार दरमहा बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भोसरी-इंद्रायणीनगर येथे रोहित्राच्या स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तीन महिलांचा बळी गेला. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात दरमहा बैठकीचा निर्णय घेण्यात आला. उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक विक्रांत लांडे, तुषार कामठे, अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, उपआयुक्त सुभाष इंगळे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य उद्यान अधीक्षक दत्तात्रेय गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, देवन्ना गट्टूवार, थॉमस नरोन्हा, दिलीप धुमाळ, प्रवीण घोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिलवाल, उपअभियंता माधव सोनावणे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पंकज टगलपल्लेवार, कार्यकारी अभियंता राहुल गवारे, शिवाजी वायफळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रेय बालगुडे, अशोक जाधव, भुजंगराव बाबर आदी उपस्थित होते. महापौर ढोरे म्हणाल्या, "इंद्रायणीनगर घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना महावितरणने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी. रोहित्रांच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका, पोलिस व महावितरणने संयुक्त मोहीम राबवावी.'' 

बैठकीत झालेले निर्णय 

- वीज वितरण बॉक्‍स उघडे असतात, ते तातडीने दुरुस्त करावेत 
- रस्ते खोदाई करताना महापालिका व महावितरणमध्ये समन्वय असावा 
- भविष्याचा विचार करून सर्व समावेशक विकास आराखडा तयार करावा 
- रोहित्रांच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावे 
- भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी स्वतंत्र चेंबर्सची व्यवस्था करावी 

निगडीत सबस्टेशन 

निगडीत ट्रान्सपोर्ट हब तयार झाले आहे. याठिकाणी मेट्रो स्टेशन व चार्जिंग सेंटर प्रस्तावित आहे. तिथे अतिउच्चदाब सब स्टेशन उभारल्यास या प्रकल्पांबरोबरच रावेत अशुद्ध जलउपसा व प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्राला वीज मिळेल, यासाठी निगडीत सबस्टेशन उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव महावितरणने तयार करावा. 

शहरातील रोहित्रांच्या परिसरांचे सर्वेक्षण सुरू आहे. अनेक ठिकाणी रोहित्रांना संरक्षणात्मक कवच बसविण्यात येत आहेत. इंद्रायणीनगरसारख्या घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेतली जाईल. 
- पंकज टगलपल्लेवार, अधीक्षक अभियंता, महावितरण 
 

loading image