

Abandoned Vehicles in Kalewadi Raise Civic Safety Concerns
Saklal
काळेवाडी : काळेवाडीतील मुख्य रस्त्यांपासून ते दाट वस्तीच्या गल्ली-बोळांपर्यंत मोठ्या प्रमाणात बेवारस दुचाकी आणि चारचाकी वाहने पडून असून महापालिका आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ही वाहने कोणाची, का सोडून दिली आहेत आणि किती काळापासून येथे पडून आहेत याचा कोणताही तपास किंवा चौकशी होत नाही. मुख्य रहिवासी भाग असलेल्या काळेवाडीतील आझाद चौकात गृहनिर्माण सोसायटीच्या वळणाजवळ एक कार गेल्या अनेक महिन्यांपासून बेवारस स्थितीत पडून आहे.