

Illegal Constructions Rising Rapidly in Kalewadi–Thergaon
Sakal
जयंत जाधव
पिंपरी : महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काळेवाडी, थेरगाव, पिंपरी गाव, पिंपरी कॅम्प या परिसरांत अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे वाढली आहेत. लागेबंधे आणि ‘देवाणघेवाण’ असलेली बांधकामे आणि अतिक्रमणांना अभय दिले जात आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे, तर सर्वसामान्यांना मात्र किरकोळ कारणांवरून त्रास दिला जात आहे.