esakal | सोशल मीडियावर कामशेतच्या उड्डाणपुलाचीच चर्चा; काय आहे प्रकरण घ्या जाणून 
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडियावर कामशेतच्या उड्डाणपुलाचीच चर्चा; काय आहे प्रकरण घ्या जाणून 

येथील उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.

सोशल मीडियावर कामशेतच्या उड्डाणपुलाचीच चर्चा; काय आहे प्रकरण घ्या जाणून 

sakal_logo
By
रामदास वाडेकर

कामशेत (ता. मावळ) : येथील उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगलीय. त्यात पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याच्या डागडुजीचे किती बजेट वाढणार, कुणी अंदाजपत्रक देईल का, पूल कधीपर्यंत पूर्ण होईल, काय अंदाज कुणाचा, मला तर वाटतंय हा पूल पाडून सरकारने नवीन टेंडर काढावे?, अशा शब्दांत नेटिझन्स कॉमेंट करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काहींनी तर कुणाला भूमीपूजन आठवत असेल, तर तारीख सांगा?, अशी विचारणा केली. यामध्ये पंचक्रोशीतील तरुणांनी उडी घेतली. हे कमी होतं की काय, त्यात आता राजकीय पक्षाचे समर्थक व कार्यकर्ते देखील उतरले आहेत. पुलाच्या कामाबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मीडिया यांना जबाबदार धरण्यात येतंय. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरूय. हा उड्डाणपूल चार वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण झालेला नाही. येथे पुलाच्या रखडलेल्या कामामुळे व कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची कोणतीच उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, ड्रेनेज व इतर कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात प्रवासी वाहन पडून अपघात होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या खोल खड्‌ड्‌यांत एखादे प्रवासी वाहन अथवा बस पडून अपघात होण्याची शक्‍यता आहे, यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. लॉकडाउनच्या नंतर पुलाचे काम धीम्यागतीने सुरूय. या कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केलीय. त्यामुळे पुलाच्या या कामाला गती मिळवून हे काम मार्गी लागावे, या मागणीसाठी पूल ट्रोल होऊ लागला आहे. 
 

loading image