esakal | कामशेतकरांनो, उड्डाणपूल वर्षअखेरपर्यंत होणार खुला 
sakal

बोलून बातमी शोधा

कामशेतकरांनो, उड्डाणपूल वर्षअखेरपर्यंत होणार खुला 

आमदार सुनील शेळके यांचा विश्‍वास; रखडलेल्या कामाला मिळाली गती 

कामशेतकरांनो, उड्डाणपूल वर्षअखेरपर्यंत होणार खुला 

sakal_logo
By
रामदास वाडेकर

कामशेत (ता. मावळ) : येथील रेंगाळलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने वेग धरला आहे. त्यामुळे या वर्षअखेरीस हे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला होईल, असा विश्‍वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तांत्रिक अडचणींमुळे पुलाचे काम धीम्या गतीने सुरू होते. त्यातच कोरोनामुळे या कामाला विलंब झाला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊनही सहकार्य केले. परिणामी आमदार शेळके यांनी अधिकारी आणि ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. उड्डाणपुलाची वर्कऑर्डर डिसेंबर 2016 मध्ये झाली निघाली. डिसेंबर 2018 पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु, तांत्रिक अडचणी आणि रेल्वेलाइनच्या उच्च विद्युत वाहिनीच्या स्थलांतराचे काम बाकी असल्याने पुलाचे काम रखडले आहे, असे कारण ठेकेदाराने दिले होते. या विद्युत वाहिनीच्या स्थलांतरासाठी सद्यःस्थितीत दोन कोटी रुपये मंजूर केलेले असून, त्याचे काम सुरू आहे. ऑगस्ट 2020 पर्यंतही हे काम मार्गी लागले नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडी व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी आमदार शेळके यांनी 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरण विभागास उड्डाणपुलाचे काम 10 सप्टेंबरपर्यंत मार्गी न लागल्यास जनआंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कामास सुरुवात केली असून, सद्यःस्थितीत पुलाचे काम 80 टक्के झाले आहे. 

सद्यःस्थिती काय? 
- व्हीयूपीचे (व्हेहिकल अंडरपास) काम झाले आहे 
- आरई पॅनेलचे काम पूर्ण 
- जीएसपी डब्ल्यू एमचे काम 45 टक्के 
- डांबरीकरणाचे काम शिल्लक 
- गटारांची कामे बाकी 
- जंक्‍शन इम्प्रुमेंटचे काम बाकी 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


पुलाचे काम रखडले होते. मात्र, आता काम युद्धपातळीवर सुरू आहे. पवनानगर रस्ता व महामार्गाशेजारच्या वाड्या-वस्त्यांवर जाणाऱ्यांची वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होत आहे. परंतु, पुलाचे काम होत असल्याने कोंडीतून सुटका होईल, यात शंका नाही. नागरिकांचा प्रश्न कायमचा मार्गी लागत आहे. 
- किरण डुंबरे, रहिवासी, कामशेत