esakal | पुणे-मुंबई महामार्गावरील ढाबा पोलिसांकडून सील

बोलून बातमी शोधा

पुणे-मुंबई महामार्गावरील ढाबा पोलिसांकडून सील

ढाबा रात्री उशिरापर्यंत होता सुरू

पुणे-मुंबई महामार्गावरील ढाबा पोलिसांकडून सील
sakal_logo
By
रामदास वाडेकर

कामशेत (ता. मावळ, जि. पुणे) : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नायगाव येथील बब्बी दा ढाब्यावर कामशेत पोलिसांनी कारवाई करून सील केला.

नायगावातील बब्बी दा ढाबा ॲण्ड रेस्टॉरंटचे मालक करमजित बलकारसिंग मुलतानी (वय २७, रा. नायगाव) यांनी रात्री उशिरापर्यंत ढाबा सुरू ठेवला, तसेच ग्राहकांना ढाब्याच्या आत घेऊन सुविधा देताना पोलिसांना आढळून आले. याशिवाय ढाब्यावर सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा अभाव दिसून आला. हा ढाबा वेळेत बंद करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही सूचनांचे पालन केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन; लोणावळा पोलिसांकडून कारवाई

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी विनोद रामशंकर यादव, जयनारायण सुदामा शहा, बुटासिंग ऊर्फ हॅपीसिंग मुख्यत्यारसिंग मुलतानी, रणजित दारासिंग भट्टी, गोरख शांताराम मोडुळे, साजनसिंग सतनामसिंग मल्ली (सर्व सध्या रा. बब्बी दा पंजाबी ढाबा) यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुणे-मुंबई महामार्गावरील या ढाब्यावर वाहनचालकांना खुणवून हॉटेलात बसून सेवा देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याशिवाय वारंवार तंबी देऊनही हॉटेलचालक दुर्लक्ष करीत असल्याने ढाबा सील करून कारवाईसाठी अहवाल तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे.