esakal | लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन; लोणावळा पोलिसांकडून कारवाई

बोलून बातमी शोधा

लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन; लोणावळा पोलिसांकडून कारवाई

वधू आणि वर पक्षातील 14 जणांकडून लोणावळा शहर पोलिसांनी 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन; लोणावळा पोलिसांकडून कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : कोरोना नियमांचे उल्लंघन करत लोणावळ्यात लग्न सोहळ्यासाठी हॉटेल भाड्याने दिल्याप्रकरणी ग्रँड विसावा हॉटेलच्या मालकावर भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करत 50 हजार रुपयांचा, तर फिजिकल डिस्टन्सिंगसह कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधू आणि वर पक्षातील 14 जणांकडून लोणावळा शहर पोलिसांनी 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

हेमंत मखिजा (वय 42, रा. उल्हासनगर ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न सोहळ्यासाठी 25 जणांसाठी परवानगी असताना हॉटेल ग्रँड विसावामध्ये सरकारची कोणतीही परवानगी न घेता लग्न सोहळा सुरू असल्याचे उघड झाले. हॉटेलमध्ये लग्नासाठी 76 लोकांची उपस्थिती ठेवून हॉटेलमधील एकूण 38 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलला 50 हजार रुपयांचा दंड व एकूण 14 लोकांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करून 14 हजाराचा दंड घेतला आहे. चार दिवसापूर्वीच पोलिसांनी तुंगार्लीतील गोल्ड व्हॅली येथे एका बंगल्यात विनापरवाना सुरू असलेल्या लग्न सोहळ्यावर कारवाई केली होती. एकीकडे कोरोनाचा उद्रेक वाढत असताना, दुसरीकडे आठवडाभरात लोणावळ्यात दोनदा कारवाई करण्यात येत लोकांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.