Kirtan Mahotsav : ढोक महाराजांच्या हस्ते शनिवारी कीर्तन महोत्सवाचे उद्‌घाटन

‘सकाळ’ने शनिवारपासून (ता. १३) चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
Nachu Kirtanache Rangi
Nachu Kirtanache Rangisakal

पिंपरी - श्रीमद्‌ भागवतात नवविधा भक्तीचे वर्णन ‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम।’ असे आहे. त्यातील एक म्हणजे ‘कीर्तन’ आणि कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि ‘वारकरी संप्रदाय’ म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.

हीच पंढरपूरची वारी आता सुरू आहे; पण इच्छा असूनही ज्यांना वारीला जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ‘सकाळ’ने शनिवारपासून (ता. १३) चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी वारी म्हणजे आनंद. मात्र, नोकरी, व्यवसाय वा कामधंद्यानिमित्त काही तात्कालिक अडचणींमुळे अनेकांना पंढरपूरच्या आषाढी वारीत जाणे शक्य होत नाही. पण, पांडुरंगाच्या सेवेची, नामस्मरणाची आस सर्वांना असते. त्यांच्यासाठीच आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ’ने कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

शनिवारी (ता. १३) सायंकाळी पाचला नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते कीर्तन महोत्सवाचे उद्‍घाटन होईल. त्यानंतर त्यांची कीर्तन सेवा होईल. बुधवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता आळंदी येथील कीर्तनकार चिंदबरेश्‍वर महाराज साखरे यांच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप होईल. वस्रकला पैठणी आणि सिल्क सारीज् हे सहप्रायोजक आहेत.

कीर्तन महोत्सवाविषयी वारकरी म्हणतात...

‘सकाळ’ ही बिनभिंतीची शाळा आहे. संत विचारांचे विद्यापीठ आहे. साधू-संतांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचा वसाच त्यांनी घेतला आहे. एखाद्या वृत्तपत्राने संत विचारांच्या प्रसारासाठी काम करणे, हेच परमभाग्याचे लक्षण आहे. आषाढी वारीनिमित्त त्यांनी आयोजित केलेला कीर्तन महोत्सव पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आनंदाची पर्वणी आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

- जयंत ऊर्फ आप्पा बागल, सचिव, महाराष्ट्र वारकरी महामंडळ

आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘सकाळ’चा कीर्तन महोत्सव स्तुत्य व चांगला संकल्प आहे. आदर्श उपक्रम आणि पर्वकाळ आहे. ज्येष्ठ भाविकांना वारीला जाणे शक्य होत नाही. कामानिमित्तही अनेक जण वारीला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ‘ठाईचि बैसुनि करा एक चित्त’ अशी अनुभूती कीर्तन महोत्सवातून मिळणार आहे. काया, वाचा, मनाने भगवंताच्या नामाचे चिंतन होईल.

- महावीर महाराज सूर्यवंशी, कीर्तनकार तथा सचिव, अखिल भारतीय वारकरी महामंडळ

कीर्तनांची वेळ आणि कीर्तनकार

 • शनिवार, ता. १३ - सायंकाळी ५ - नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक

 • रविवार, ता. १४ - सायंकाळी ५ - पैठण येथील कीर्तनकार आणि संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगिराज महाराज गोसावी

 • सोमवार, ता. १५ - सायंकाळी ५ - पुणे येथील महिला कीर्तनकार रोहिणीताई माने-परांजपे

 • मंगळवार, ता. १६ - सायंकाळी ५ - आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील

 • बुधवार, ता. १७ - सकाळी १० - आळंदी येथील कीर्तनकार चिंदबरेश्‍वर महाराज साखरे

काय? कुठे? कधी? केव्हा? कसे?

 • काय? - ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव

 • कुठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

 • कधी? - १३ ते १७ जुलै २०२४

 • केव्हा? - १३ ते १६ जुलै सायंकाळी ५ वा.

 • १७ जुलै सकाळी १० वा.

 • कसे? - प्रवेश विनामूल्य

अधिक माहितीसाठी संपर्क

शिवम - ९३०७७१५९०३, अक्षय - ९५६१३१४६७९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com