Kiwale Village : जगाच्या नकाशावर पोहोचलेलं किवळेगाव

गावाला जोडणारे पांदण रस्ते, दोन्ही बाजूला घनदाट झाडी, त्यामुळे गावात जायला भीती वाटायची; पण १९९७ मध्ये गावाचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला आणि हळूहळू गावाचा कायापालट होऊ लागला.
Kiwale Village
Kiwale Villagesakal
Summary

गावाला जोडणारे पांदण रस्ते, दोन्ही बाजूला घनदाट झाडी, त्यामुळे गावात जायला भीती वाटायची; पण १९९७ मध्ये गावाचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला आणि हळूहळू गावाचा कायापालट होऊ लागला.

गावाला जोडणारे पांदण रस्ते, दोन्ही बाजूला घनदाट झाडी, त्यामुळे गावात जायला भीती वाटायची; पण १९९७ मध्ये गावाचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला आणि हळूहळू गावाचा कायापालट होऊ लागला. आज पंचवीस वर्षांनंतर मागे वळून पाहता गावात आमूलाग्र बदल झाल्याचं दिसतंय. सिंबायोसिससारखं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ गावात आलंय. गावाची ओळख जगाच्या नकाशावर झालीय, हे गाव म्हणजे तुमचं आमचं किवळे.

ओळख उपनगरांची...!

किवळे गावात १९९७ पर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात होती. गावठाणासह विकासनगर, बापदेवनगर, आदर्शनगर, श्रीनगर, एमबी कॅम्पचा त्यात समावेश होता. पुणे-मुंबई महामार्गापासून खूप लांब एका कोपऱ्यात गाव होतं. पण, कालांतराने महामार्गावरील देहूरोड ते पुण्याचे दक्षिण टोक कात्रजला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाची निर्मिती झाली. तो मार्ग किवळेतूनच गेला आणि गाव सर्वांच्या नजरेत आले. १९९६ मध्ये अस्तित्वात आलेल्या युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची निर्मिती झाली. त्याचे प्रवेशद्वाराच किवळे ठरले. शिवाय, १९९७ मध्ये गावाचा समावेश महापालिकेत झाला आणि गावाच्या प्रगतीचा, विकासाचा आलेख चढता राहिला.

ठळक वैशिष्ट्ये

  • रावेत ते किवळे व्हाया कोतवालनगर या ६० फुटी रस्त्याचे काम

  • पीएमपीने बीआरटी मार्गासह बस टर्मिनन्स उभारले

  • पिंपरी-चिंचवडसह पुण्याच्या विविध भागांत जाण्यासाठी थेट बससेवा

  • गावात पेशवेकालीन रानडेवाडा आहे. पर्यटक त्याला आवर्जून भेट देतात. वाड्यात चित्रपटांचे चित्रीकरणही होते. सध्या टपाल कार्यालय आहे.

  • गावाच्या पश्चिमेस पवना नदी वाहते, त्यामुळे गावावर निसर्गाची कृपादृष्टी आहे. गावाच्या आजूबाजूला झाडी आहे.

  • महापालिकेने गावात दवाखाना, माध्यमिक शाळाही सुरू केली आहे, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची सोय झाली आहे.

नाशिक महामार्ग जोडणार

चिंचवडगाव व निगडीला जाण्यासाठी रावेतमार्गे वळसा घालून जावे लागत आहे. मुकाई चौक ते निगडी भक्ती-शक्ती चौक जोडून पुणे-मुंबई व नाशिक महामार्ग जोडला जाणार आहे. या बीआरटी मार्गाचे व पुलाचे रखडलेले काम सुरू झाले आहे. त्यामुळे किवळे-निगडी अंतर अवघे दहा मिनिटांवर येणार आहे.

विकासाला चालना

विकासनगर येथील प्रमुख अंतर्गत रस्त्यांसह मुकाई चौक-निगडी या नियोजित बीआरटीला जोडणाऱ्या रेल्वेलाईनच्या बाजूने श्रीनगरनगरला जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. या रस्त्यास जोडणाऱ्या दत्तनगर, माळवालेनगर रस्तेही विकसित झाल्याने दुकानांची संख्या वाढून ग्राहकांची सोय झाली आहे.

वाढते गृहप्रकल्प

किवळे गावातील प्रमुख ६० फुटी रस्त्यांच्या दुतर्फा तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फाही गेल्या दहा वर्षांत अनेक टोलेजंग गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे स्थानिकांची आर्थिक सुबत्ता गगनाला मावेनाशी झाली आहे. साहजिकच स्थलांतरित कुटुंबांची संख्याही किवळे गावात अनेक पटीने वाढली आहे.

ग्रामदैवत बापदेव महाराज

किवळे गावचे ग्रामदैवत बापदेव महाराज यांचे गावठाणात मंदिर आहे. अक्षय तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच वैशाख शुद्ध पंचमीला यात्रा असते. आता यात्रेला पारंपरिक व आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गावाशेजारून वाहणाऱ्या पवना नदीच्या काठावर जुने केवलेश्वर मंदिर आहे. आता ते महादेव मंदिर म्हणून परिचित आहे. केवलेश्वराच्या नावावरून गावाचे नाव किवळे पडले असल्याचे गावातील जुने ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गामुळे गावाचे महत्त्व निश्चितच वाढले आहे.

- मारुती दांगट, रहिवासी, किवळे

किवळे गावातील रस्ते आधी चिखलाचे होते. सर्वांची उपजीविका शेतावरच अवलंबून होती. खरीप आणि रब्बी पिके घेतली जायची. अन्नधान्याचा कधी तुटवडा जाणवला नाही. घरे मातीची व कौलारू होती. आधुनिकीकरणाच्या प्रवासात शहरीकरण वाढलंय. याचा निश्चितच सर्व किवळेवासीयांना आनंदच आहे.

- मोरेश्वर कातळे, ज्येष्ठ नागरिक, किवळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com