
- खेळणी, बाकांची दुरवस्था; दुरुस्तीची नागरिकांची मागणी
जुनी सांगवी : येथील परिसरात महापालिकेची पाच उद्याने आहेत. त्यात संत गोरोबा कुंभार, संत सावता माळी, छत्रपती शिवाजी महाराज, वेताळ महाराज व शिवसृष्टी यांचा समावेश आहे. लॉकडाउनमध्ये बंद असलेली ही उद्याने अनलॉकमध्ये सुरू झाली. मात्र, येथील एका उद्यानात चार वर्षीय बालक खेळताना जखमी झाला. त्यानंतर या सर्व उद्यानांच्या पाहणी केली असता असे लक्षात आले की, घसरगुंडी, गजिबो यासारख्या खेळण्यांची व बाकांची दुरवस्था झाली आहे. त्याविषयी घेतलेला आढावा.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
१) संत सावता माळी
- लोखंडी प्रवेशद्वाराचाच पत्रा वाकलेला
- बाकडेही गंज लागून तुटलेले
- फायबरच्या घसरगुंडीचे तुकडे निघालेत
- उद्यानात अस्वच्छता
- विशेषतः सकाळी नागरिकांची गर्दी
२) शिवसृष्टी
- छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पे साकारली आहेत
- मावळ्यांच्या शिल्पांचे रंग उडालेत
- खेळण्यांची दुरवस्था
- उद्यानातील गवत वाळलेले
- धूळ, मातीमुळे दिव्यांचा प्रकाश अंधूक
३) संत गोरोबा कुंभार
- सर्वांत जुने उद्यान
- खेळण्याची दुरवस्था झालेली
- फायबरच्या गजबो खेळण्याचे तुकडे पडलेले
- अस्वच्छता व रंग उडालेल्या खेळण्यांमुळे बकालपणा
- नियमित स्वच्छता होत नाही
४) वेताळ महाराज
- पवना नदीकाठी विकसित केलेले जुने उद्यान
- वेळोवेळी डागडुजी, दुरुस्त्या केल्या जातात
- नदी किनारी असल्याने मद्यपींचा वावर अधिक
- इतर उद्यानांपेक्षा नागरिकांची संख्या तुरळक
५) छत्रपती शिवाजी महाराज
- सांगवीतील सर्वांत मोठे उद्यान
- नागरिकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात
- मुलांच्या तुलनेने खेळण्यांची संख्या कमी
- नवी खेळणी बसविण्याची मागणी
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
खेळताना मुलगा जखमी
शिवसृष्टी उद्यानात चार वर्षीय सक्षम कारळे हा घसरगुंडीवर खेळताना जखमी झाला. घसरगुंडीच्या फटीत त्याला उजव्या पायाची करंगळी गमवावी लागली. खेळण्यांच्या दुरुस्तीकडे उद्यान प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सक्षमचे वडील सागर कारळे म्हणाले की, जो प्रसंग माझ्या मुलाबाबत झाला, तो दुसऱ्या मुलांवर ओढवू नये. या घटनेनंतर उद्यान विभागाने त्या ठिकाणी तात्पुरते एमसील व काठी लावून घसरगुंडी बंद केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘‘संत सावता माळी उद्यानात जुन्या खेळण्यांनाच रंगरंगोटी केली आहे. येथील लोखंडी बाक तुटलेले आहे.’’
- संजय गायकवाड, स्थानिक रहिवासी‘‘शिवसृष्टी उद्यानातील सर्व दुरुस्त्या करण्याबाबत वरिष्ठांना कळविले असून, ती घसरगुंडी तात्पुरती बंद केली आहे.’’
- जे. व्ही. पटेल, उद्यान अधिकारी, ‘ह’ प्रभाग‘‘आयुक्तांना लेखी तक्रार दिली आहे. दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.’’
- प्रशांत शितोळे, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस