मोशी उपबाजारात कोथिंबिरीच्या जुड्यांची मोठी आवक; पालेभाज्यांचे भाव घटले 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

 • मोशीतील श्री नागेश्‍वर महाराज उपबाजार समितीमध्ये रविवारी (ता. 24) पालेभाज्यांची 33 हजार 500 जुड्यांची आवक झाली.

मोशी (पिंपरी-चिंचवड) : या आठवड्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतीमालाच्या उत्पन्नास पोषक वातावरण निर्माण होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे. परिणामी मोशीतील श्री नागेश्‍वर महाराज उपबाजार समितीमध्ये रविवारी (ता. 24) पालेभाज्यांची 33 हजार 500 जुड्यांची आवक झाली. त्यामध्ये केवळ कोथिंबिरीच्या जुड्यांची 12 हजार 300 जुड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव 50 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फळभाज्यांमध्ये कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी, कारली आदी फळभाज्यांची दोन हजार 556 क्विंटल आवक झाली आहे. फळभाज्यांची आवक 10 टक्‍क्‍यांनी वाढून भावही 10 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. फळबाजारात पपई, केळी, अननस, कलिंगड, खरबूज आदी फळांची 479 क्विंटल आवक झाली. मागील आठवड्यापेक्षा फळांची 25 टक्के आवक जास्त झाल्याने भावातही 25 टक्के कपात झाली आहे. 

शेतीमाल बाजार भाव व आवक : 

फळभाज्या आवक : 
दोन हजार 556 क्विंटल 
बाजारभाव एक किलोचे 

 • कांदा नवीन : 15 ते 20 
 • कांदा जुना : 20 ते 35 
 • बटाटा नवीन : 15 ते 20 
 • बटाटा जुना : 20 ते 25 
 • लसूण : 70 ते 80 
 • आले : 30 ते 40 
 • भेंडी : 30 ते 40 
 • गाजर : 30 ते 35 
 • दिल्ली : 25 ते 30 
 • महाबळेश्‍वर : 35 ते 40 
 • गवार : 30 ते 40 
 • टोमॅटो : 10 ते 20 
 • मटार : 15 ते 20 
 • घेवडा : 25 ते 30 
 • बीन्स : 50 ते 60 
 • दोडका : 40 ते 50 
 • घोसावळे : 30 ते 40 
 • मिरची लवंगी : 40 ते 50 
 • मिरची साधी : 35 ते 40 
 • ढोबळी : 30 ते 35 
 • दुधी भोपळा : 12 ते 15 
 • डांगर भोपळा : 10 ते 12 
 • भुईमूग शेंग : 50 ते 60 
 • काकडी : 20 ते 25 
 • कारली हिरवी : 25 ते 30 
 • कारले पांढरे : 20 ते 25 
 • पडवळ : 30 ते 35 
 • पापडी : 30 ते 25 
 • फ्लॉवर : 5 ते 10 
 • कोबी : 5 ते 8 
 • वांगे हिरवे : 25 ते 30 
 • वांगे बंगाळे : 20 ते 25 
 • वांगे भरताचे : 25 ते 30 
 • सुरण : 30 ते 40 
 • तोंडली लहान : 25 ते 30 
 • तोंडली जाड : 20 ते 25 
 • बीट : 10 ते 12 
 • कोहळा : 20 ते 22 
 • पावटा : 25 ते 35 
 • वाल : 25 ते 35 
 • वालवर : 25 ते 35 
 • शेवगा : 40 ते 50 
 • ढेमसे : 35 ते 40 
 • नवलकोल : 35 ते 40 
 • डबल बी : 40 ते 45 
 • डिंगरी : 25 ते 30 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालेभाज्या आवक : 
36 हजार 500 जुड्या 
पालेभाज्या : भाव एका जुडीचे 

 • कोथिंबीर गावरान : 8 ते 10 
 • कोथिंबीर साधी : 6 ते 8 
 • मेथी : 5 ते 8 
 • शेपू : 4 ते 8 
 • कांदापात : 10 ते 12 
 • पालक : 5 ते 7 
 • मुळा : 5 ते 8 
 • चवळी : 5 ते 8 
 • चाकवत : 5 ते 8 
 • चुका : 5 ते 8 
 • अंबाडी : 5 ते 8 
 • राजगिरा : 6 ते 8 
 • हरभरा : 10 ते 12 
 • कढीपत्ता : 4 ते 5 
 • माठ : 8 ते 10 
 • पुदिना : 3 ते 5 
 • नारळ : 25 ते 30 
 • मका कणीस : 5 ते 7 
 • लिंबू : 50 ते 60 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फळे आवक : 479 क्विंटल 
भाव एक किलोचे/नगाचे 

 • सफरचंद : 
 • काश्‍मिरी : 130 ते 160 
 • सिमला : 120 ते 150 
 • पपई : 20 ते 25 
 • केळी : 30 ते 40 रु. डझन 
 • मोसंबी : 60 ते 80 
 • संत्री : 30 ते 40 
 • डाळिंब : 75 ते 90 
 • बोर : 50 ते 80 
 • शहाळे : 30 ते 40 रु. नग 
 • पेरू : 40 ते 50 
 • चिकू : 50 ते 60 
 • कलिंगड : 25 ते 30 रु. किलो 
 • खरबूज : 35 ते 40 
 • अननस : 50 ते 60 
 • किवी : 75 ते 80 
 • चिंच : 45 ते 50 

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to know the prices of vegetables in the committee at moshi sub-market

टॉपिकस
Topic Tags: