
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात अगोदरच मनुष्यबळाची कमतरता असून, अशातच आता ठाण्यातील एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करावे लागत आहे. एक कर्मचारी आढळला तरी त्यामागे किमान दहा ते पंधरा कर्मचारी क्वारंटाईन होत आहेत. यामुळे पोलिसांना कोरोनाच्या संसर्गाची जोखीम पत्करून अपुऱ्या मनुष्यबळात काम करावे लागत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस दलात सध्या विविध पोलिस ठाण्यातील पाच पोलिस पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अनेक कर्मचारीही क्वारंटाईन करण्यात आले आहेत. अगोदरच सध्या तीस लाख लोकसंख्येमागे केवळ तीन हजार पोलिस आहेत. अशातच उपलब्ध कर्मचारीही क्वारंटाईन होत असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मागील चार दिवसात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या देहूरोड पोलिस ठाण्यातील दोघांचा, तर शिरगाव पोलिस चौकीतील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. देहूरोड ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा गुरूवारी अहवाल आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन अधिकारी व नऊ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच याच ठाण्यातील आणखी एका कर्मचाऱ्याचा अहवाल चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील तिघांना यापूर्वीच क्वारंटाईन केलेले आहे. यामुळे या ठाण्यातील मनुष्यबळ अचानकच कमी झाले. हे कर्मचारी ठाण्यातील स्टाफपैकी असल्याने याचा कामकाजावरही परिणाम झाला आहे. इतरवेळी ठाण्याच्या हद्दीत तीन बीट मार्शल असतात मात्र सध्या एकाच बीट मार्शलवर संपूर्ण हद्दीचा भार आहे. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तर शिरगाव चौकीतील एक कर्मचारी गुरूवारी पॉझिटिव्ह आढळल्याने येथील अधिकाऱ्यासह पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे या चौकीतील कामकाजावर परिणाम झाला. त्यामुळे तीर्थक्षेत्र देहू याठिकाणी असलेल्या बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांची या चौकीत तातडीने नेमणूक करण्यात आली. यासह वाकड पोलिस ठाण्यातही एक रूग्ण आढळल्याने याठिकाणचेही काही कर्मचारी क्वारंटाईन आहेत. दरम्यान, यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता तेरावर गेला आहे.
दीडशे ऐवजी ऐंशीच कर्मचारी
गुन्ह्यांचा तपास, कंटेन्मेंट झोनसह इतर ठिकाणचा बंदोबस्त, गस्त यासह पोलिस ठाण्यातील कामकाजासाठी मनुष्यबळ आवश्यक असते. मात्र, सध्या ज्याठाण्यात किमान दीडशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेथे केवळ ऐंशी ते शंभर कर्मचाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. अन् अशातच कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करावे लागत असल्याने सर्वच कामावर परिणाम होत आहे.
तातडीने कर्मचारी पुरवावेत
अचानक काही कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करावे लागल्यास किमान दैनंदिन कामकाजासाठी आयुक्तालयाकडून तातडीने कर्मचारी पुरविले जावेत, अशी अपेक्षा वरिष्ठ निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.