पुणे विभागात 'प्लाझ्मा'चा तुटवडा, तर सर्वाधिक दाते पिंपरी-चिंचवडमध्ये

सुवर्णा नवले
Thursday, 6 August 2020

  • पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रक्तपेढीमधून सर्वाधिक प्लाझ्मा जमा व दानही
  • सूसन रक्तपेढीमध्ये सध्या 57 पिशव्या शिल्लक

पिंपरी : सध्या प्लाझ्मा जीवनदान देण्यासाठी उपयोगी ठरत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी 'प्लाझ्मा थेरपी' अत्यंत प्रभावी ठरत आहे. बाधितांची संख्या वाढत असली, तरी त्या तुलनेत प्लाझ्मादात्यांची संख्या नगण्य आहे. पुणे विभागीय स्तरावर कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांतील आठ रक्तपेढीच्या माध्यमातून 364 पिशव्या (प्रत्येकी 200 मिली) प्लाझ्मा जमा झालेला आहे. त्यापैकी 251 पिशव्या प्लाझ्मादान झाले असून, 113 प्लाझ्माच्या पिशव्या शिल्लक आहेत. पुणे विभागीय अन्न, औषध प्रशासनाचे याकडे लक्ष असून, दररोज रक्तपेढ्यांकडून अद्ययावत माहिती घेतली जात असल्याचे पुणे अन्न-औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एस. बी. पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक वायसीएम रक्तपेढीतून आतापर्यंत 179 पिशव्या प्लाझ्मा जमा झाला आहे. आतापर्यंत 163 पिशव्या प्लाझ्मादान झाले आहे. एकूण सात रक्तपेढींच्या माध्यमातून आतापर्यंत 72,800 मिली प्लाझ्मा जमा झाला असून, 50,200 मिली प्लाझ्मा वाटप झाले आहे, तर 22,600 मिली प्लाझ्मा शिल्लक आहे. कोरोनाबाधितांच्या तुलनेत प्लाझ्माची संख्या नगण्य आहे. ज्येष्ठ, लहान मुले व महिला यांच्या प्रतिकारशक्तीप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात प्लाझ्माची गरज पडत आहे. काही जणांना आतापर्यंत तीन ते चार वेळा प्लाझ्मा थेरपीची गरज भासली आहे. तर काही जण एका थेरपीमध्येदेखील बरे झाले आहेत. खासगी रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मादान अत्यंत नगण्य प्रमाणात जमा होत आहे. मात्र, काही ठिकाणी खासगी रक्तपेढ्यांना दाता निवडून रक्त घेणे व रक्तघटकास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्लाझ्मामध्ये काळा बाजार होण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. काही गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. काही खासगी रक्तपेढ्यांनाही प्लाझ्माची परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी परस्पर प्लाझ्मा विकण्याचे प्रकार घडू शकतात. प्लाझ्मा घेतल्यानंतर तो योग्य तापमानाला साठवून ठेवणे तसेच, दात्याच्या योग्य त्या चाचण्या करणे. त्याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. यासाठी डॉक्‍टरांच्या मागणीप्रमाणे योग्य ती कागदपत्रे जमा केल्यानंतरच रुग्णाला रक्त देता येणार आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय प्लाझ्मा घेता येणार नाही. सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. या सर्व प्रक्रियेवर अन्न, औषध प्रशासनाची करडी नजर आहे.

प्लाझ्मा सद्य:स्थिती (प्लाझ्मा प्रत्येकी 200 मिलीमध्ये)

रक्तपेढी.........जमा......वाटप......शिल्लक 

ससून, पुणे.......75.........18.........57 
वायसीएम, पिंपरी-चिंचवड......179........163......16 
आदित्य बिर्ला, पिंपरी-चिंचवड.......4........4.........-
राकेश जैन, पुणे.........6.........3..........3 
जनकल्याण, पुणे........26...........26.........-
सिम्बॉयसिस, मुळशी, पुणे..........-............-.............-
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, सांगली..........14.......-.........14 
राजश्री छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर..........60.........37..........23 
एकूण (मिली).............72,800...........50,200.............22,600

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack of plasma in pune division for corona treatment