
अमोल शित्रे
पिंपरी : पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आली. अशावेळी कधीही घराबाहेर न पडलेल्या ललिता कुटे यांनी अवघ्या एक वर्षाच्या पोटच्या गोळ्याला घेऊन संघर्षमय जीवनाला सुरुवात केली. पतीनंतर आपणही महावितरणमध्ये नोकरी करायची या जिद्दीने पेटून उठलेल्या ललिता यांनी २००७ पासून महावितरणच्या विविध विभागांत काम करत वरिष्ठ प्रधान तंत्रज्ञ पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा जीवन प्रवास सर्वांसाठी आदर्श ठरवा असाच आहे.