esakal | Breaking : आडोशी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक संथ गतीने!
sakal

बोलून बातमी शोधा

Landslide_Adoshi_Tunnel

आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर क्र. ४१ जवळ मुंबई लेनवर आयआरबी कंपनीच्या वतीने डोंगरावरील धोकादायक दरडी पाडण्यासाठी लूज स्केलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे.

Breaking : आडोशी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक संथ गतीने!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ गुरुवारी (ता.२२) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कसलीही हानी झाली नाही. द्रुतगती मार्गावरील वाहतूक पहिल्या आणि दुसऱ्या लेनवरुन सुरळीत सुरू आहे. सध्या लोणावळा, खंडाळा परिसराला परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.

पाकिस्तानच्या चौघांना भारतीयत्व बहाल; पिंपरी-चिंचवडमध्ये आहे वास्तव्य!​

आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर क्र. ४१ जवळ मुंबई लेनवर आयआरबी कंपनीच्या वतीने डोंगरावरील धोकादायक दरडी पाडण्यासाठी लूज स्केलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी याच ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती. द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबी कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. द्रुतगती मार्गावर खाली आलेल्या दरडी हटविण्यात आल्या. यादरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)