मोशी (पिंपरी-चिंचवड) : सध्या सुरू असलेल्या हिवाळ्यातील शेतीमालाच्या उत्पन्नास पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यास राज्याच्या विविध भागांमध्ये शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. रविवारी (ता. 20) मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये 42 हजार 550 जुड्या कोथिंबीर, मेथी, पालक आदी पालेभाज्या, दोन हजार 364 क्विंटल कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आदी फळभाज्या तर 365 क्विंटल कलिंगड. खरबूज, अननस, पपई आदी फळांसह शेतीमालाची आवक झाली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शेतीमालातील आले, लसूण, मिरची. बीन्स, दोडका आदी फळभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, बीट, कांदापात वगळता सर्वच पालेभाज्यांची मोठी आवक झाल्याने पालेभाज्यांच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सफरचंद, किवी, शहाळे आदी फळे वगळता अन्य फळांच्या भावातही काही प्रमाणात घट झाली आहे.
फळभाज्या आवक : दोन हजार 364
बाजारभाव एक किलोचे
- कांदा नवीन : 10 ते 20
- कांदा जुना : 15 ते 25
- बटाटा नवीन : 15 ते 20
- बटाटा जुना : 18 ते 22
- लसूण : 80 ते 100
- आले : 100 ते 120
- भेंडी : 20 ते 35
गाजर :
- दिल्ली : 30 ते 40
- महाबळेश्वर : 40 ते 45
- गवार : 30 ते 40
- टोमॅटो : 40 ते 45
- मटार : 30 ते 40
- घेवडा : 30 ते 40
- बीन्स : 40 ते 50
- दोडका : 30 ते 40
- मिरची लवंगी : 40 ते 45
- मिरची साधी : 30 ते 40
- ढोबळी : 20 ते 30
- दुधी भोपळा : 10 ते 15
- डांगर भोपळा : 8 ते 10
- भुईमूग शेंग : 50 ते 60
- काकडी : 12 ते 15
- कारली हिरवी : 15 ते 20
- कारले पांढरे : 14 ते 18
- पडवळ : 30 ते 40
- पापडी : 30 ते 40
- फ्लॉवर : 5 ते 10
- कोबी : 5 ते 8
- वांगे हिरवे : 15 ते 20
- वागे बंगाळे : 20 ते 22
- वांगे भरताचे : 20 ते 22
- सुरण : 30 ते 40
- तोंडली लहान : 20 ते 22
- तोंडली जाड : 15 ते 20
- बीट : 10 ते 12
- कोहळा : 20 ते 22
- पावटा : 25 ते 35
- वाल : 25 ते 35
- वालवर : 22 ते 30
- शेवगा : 60 ते 80
- ढेमसे : 30 ते 40
- नवलकोल : 30 ते 40
- डबल बी : 30 ते 40
- डिंगरी : 20 ते 30
पालेभाज्या आवक : 42 हजार 550 जुड्या
पालेभाज्या : भाव एका जुडीचे
- कोथिंबीर गावरान : 5 ते 10
- कोथिंबीर साधी : 3 ते 5
- मेथी : 5 ते 8
- शेपू : 5 ते 8
- कांदापात : 10 ते 12
- पालक : 5 ते 8
- मुळा : 5 ते 8
- चवळी : 5 ते 8
- चाकवत : 5 ते 8
- चुका : 5 ते 8
- अंबाडी : 5 ते 8
- राजगिरा : 5 ते 8
- हरभरा : 5 ते
- कढीपत्ता : ते 8
- माठ : 8 ते 10
- पुदिना : 5 ते 6
- नारळ : 25 ते 30
- मका कणीस : 8 ते 10
- लिंबू : 70 ते 80
फळे आवक : 365 क्विंटल
भाव एक किलोचे/नगाचे
- सफरचंद :
- काश्मिरी : 180 ते 200
- सिमला : 180 ते 210
- पपई : 10 ते 15
- केळी : 30 ते 40 रु. डझन
- मोसंबी : 60 ते 80
- संत्री : 50 ते 70
- डाळिंब : 70 ते 90
- बोर : 50 ते 80
- शहाळे : 25 ते 40 रु. नग
- पेरू : 40 ते 50
- चिकू : 50 ते 60
- कलिंगड : 15 ते 20 कि.
- खरबूज : 20 ते 25
- अननस : 40 ते 60
- किवी : 70 ते 80
- चिंच : 40 ते 50