मावळात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

मावळ तालुक्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र, स्थिर (शेकडा ३.५) आहे. सोमवारी दिवसभरात ६५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कामशेत येथील कोरोनाबाधित ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ५६० व मृतांची संख्या १५९ झाली आहे. ३ हजार ७६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी १५९ जणांना घरी सोडण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ६५ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १७, लोणावळा येथील १४, कामशेत येथील १०, वडगाव, इंदोरी व सोमाटणे येथील प्रत्येकी चार, वराळे, कान्हे व कार्ला येथील प्रत्येकी दोन; टाकवे बुद्रुक, चिखलसे, कुसगाव पमा, फळणे, वडेश्वर व डोणे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ५६० झाली असून, त्यात शहरी भागातील दोन हजार ६४९ व ग्रामीण भागातील एक हजार ९११ जणांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळेगावात सर्वाधिक एक हजार ३७९, लोणावळा येथे ९९० व वडगाव येथे रुग्णसंख्या २८० एवढी झाली आहे. आतापर्यंत १५९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ७६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी १५९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ६३२ सक्रिय रुग्ण असून, त्यातील ४२० लक्षणे असलेले व २१२ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४२० जणांमध्ये ३३० जणांमध्ये सौम्य आणि ८६ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. चार जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ६३२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest corona updates in maval monday 28 september 2020