
चऱ्होली : चऱ्होली परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने अनेक नागरिकांनी लहान मुलांना शाळेत पाठविणे थांबविले आहे. वनविभागाला बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत. मात्र, ट्रॅप कॅमेऱ्यांत अजून त्याची कोणतीही हालचाल चित्रित झालेली नाही.
त्यामुळे बिबट्या एक आहे किंवा अधिक याबद्दल अद्याप वन विभागाला ठोस काही समजू शकलेले नाही. परंतु, खबरदारी म्हणून वन विभागाने गस्त सुरू केली असून काही ठिकाणी पिंजरे लावण्याचीही तयारी सुरू केली आहे.