
Junnar Leopard
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा : राजुरी या ठिकाणी बिबट्या पिंज-यात जेरबंद राजुरी या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितुनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील फुला गंगाच्या मळ्यात रहात असलेले गोविंद शंकर हाडवळे यांच्या शेतावर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली होती त्यानुसार वन विभागाने बाजुला असलेल्या शेतात पिंजरा लावला होता बुधवारी पहाटेच्या सुमारास सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिज-यात अडकला.