मी एकटाच दारूचा धंदा करतो का? बऱ्या बोलानं सोडा, दारू विक्रेत्याची पोलिसांना धमकी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

  • कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी झटापटी केली.

पिंपरी : "मी एकटाच दारूचा धंदा करतो काय? तुमचा मला पकडण्याचा काय संबंध बऱ्या बोलाने मला सोडा नाहीतर याचे परिणाम वाईट होतील', अशी धमकी एका दारू विक्रेत्याने पोलिसांना दिली. मारण्यासाठी अंगावर धावून जात हात उगारला, तसेच कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी झटापटी केली. हा प्रकार पिंपरीतील निराधारनगर झोपडपट्टी येथे घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विष्णू सुभाष सुळ (वय 32, रा. काळेवाडी, नढे कॉम्प्लेक्‍स, नढेनगर, काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार विष्णू गौतम भारती यांनी फिर्याद दिली आहे. निराधारनगर झोपडपट्टीतील शंकर मंदिराजवळ एकजण अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी (ता. 22) रात्री आठच्या सुमारास याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. त्याठिकाणी सुळ हा गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करीत असल्याचे आढळून आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पोलिसांनी त्याला पकडून आपण पोलिस असल्याची ओळख सांगून तेथून अडीच हजार रुपये किमतीची 35 लिटर दारू जप्त केली. त्यावेळी सुळ याने आरडाओरडा करून 'मी एकटाच दारूचा धंदा करतो काय, तुमचा मला पकडण्याचा काय संबंध बऱ्या बोलाने मला सोडा नाहीतर याचे परिणाम वाईट होतील', अशी धमकी पोलिसांना दिली. पोलिसांवर हात उगारून मारण्यासाठी अंगावर धावून गेला. पोलिसांशी झटापट करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत पिंपरी पोलिसांनी सुळ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापुर्वीही गुन्हे दाखल 

आरोपी विष्णू सुळ याच्यावर यापूर्वीही चिखली, निगडी पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन, चिंचवड व पिंपरी ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: liquor seller threatens police at pimpri