लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व; 23 हजार नागरिकांचा वेबिनारद्वारे सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे एक ते पाच ऑगस्टदरम्यान वेबिनारद्वारे आयोजन केले आहे.

पिंपरी : लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे एक ते पाच ऑगस्टदरम्यान वेबिनारद्वारे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात सदाभाऊ नेटके यांच्या पारंपरिक सनई वादनाने झाली. वेबिनारद्वारे आयोजित कार्यक्रमात 23 हजार नागरिकांनी सहभाग नोंदवत आदरांजली वाहिली. 

प्रा. प्रदीप कदम यांचे 'अण्णा भाऊ साठे यांचे विचार व कार्य' विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, "कोणत्याही महापुरुषाचे विचार जाणून घेण्यासाठी त्यांचे समाजकार्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अण्णा भाऊंनी साहित्यातून दिलेले योगदान बहुमूल्य आहे. ते डोळसपणे समजून घेण्याची गरज आहे. त्यांचे साहित्य सर्व मानव जातीला संदेश व प्रेरणा देणारे आहे.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'जागतिक साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भारतरत्न पुरस्कारापासून वंचित का?' या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ. सुनील भंडगे, प्रा. डॉ. चंद्रकांत काळोखे, मार्तंड साठे यांनी सहभागी घेतला. साठे म्हणाले, "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम आम्ही करीत आहोत. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार देखील वाचले जाते आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रा. डॉ. काळोखे म्हणाले, "अण्णा भाऊ साठे यांनी आपले साहित्य व गाण्यांमधून महापुरुषांविषयीचे प्रेम दाखवून दिले आहे. कष्टकरी लोक हे जग सावरण्याचे काम करणार आहेत, हे अण्णा भाऊ साठे यांचे विचार आजच्या परिस्थितीतही खरे ठरत आहेत.'' प्रा. डॉ. भंडगे म्हणाले, "अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यामधून कर्तृत्ववान स्त्रियांचे वेगळे विश्‍व उभे केले आहे. त्यांचे साहित्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत गेले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चंदन कांबळे व सहकारी आणि उमेश गवळी, राहुल शिंदे, राखी चौरे, गणेश गायकवाड यांनी प्रबोधनात्मक गीते सादर केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष दत्तु चव्हाण, सचिव संजय ससाणे, कार्याध्यक्ष नितीन घोलप, खजिनदार शिवाजी साळवे, मुख्य संघटक मेघराज साळवे, भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, प्रा. धनंजय भिसे, हनुमंत कसबे, मनोज तोरडमल, अरुण जोगदंड आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lokshahir anna bhau sathe prabodhan parv citizens participation through webinar pimpri chinchwad