

Key Traffic Restrictions During Lonavala Municipal Election
Sakal
लोणावळा : नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून, मतदारयादीत नाव तपासणे, मतदान साहित्य वाटपाची तयारी सुरू आहे; तर मतमोजणी प्रक्रियेसाठी नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानिमित्त पोलिस आणि नगर परिषद प्रशासनाने काही प्रमुख निर्णय घेतले आहेत. यात प्रामुख्याने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे यासह मतदान प्रक्रियेवेळी काही महत्त्वाचे रस्ते, बाजारपेठा व हॉटेल परिसर तात्पुरते बंद ठेवले जाणार आहेत.