
लोणावळा नगरपालिका व तळेगाव नगरपरिषद निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना गुरुवारी जाहीर झाली.
लोणावळा, तळेगावची प्रभागरचना जाहीर
लोणावळा/तळेगाव स्टेशन - लोणावळा नगरपालिका (Lonavala Nagarpalika) व तळेगाव नगरपरिषद (Talegaon Nagarparishad) निवडणुकीची (Election) प्रारूप प्रभागरचना (Ward Structure) गुरुवारी जाहीर (Declare) झाली. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता लागलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली.
२०११ च्या जनगणनेनुसार जाहीर झालेल्या या रचनेवर १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. लोणावळ्यात १३ व तळेगावमध्ये १४ प्रभाग झाले आहेत. नकाशे पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
लोणावळा नगर परिषद
लोणावळा - प्रभाग रचनेत मोठी उलथापालथ झाली आहे. काही प्रभागांचे क्रमांक व सीमारेषा बदलल्या गेल्या आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. या प्रभागरचनेचा लाभ नेमका कोणाला होणार, याविषयी चर्चा रंगू लागल्या असून राजकीय आडाखे बांधले जात आहे. नगरपालिकेची मुदत डिसेंबरमध्ये संपुष्टात आली. दहा वर्षांपूर्वीच्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५४ हजार ११९ आहे. यामध्ये अनुसूचित जाती सात हजार ५८०, अनुसूचित जमाती दोन हजार १९२ असा समावेश आहे.
प्रभाग संख्या एकने वाढून १३ झाले आहेत. तर नगरसेवक संख्या २५ वरून २७ झाली आहे. प्रभाग क्रमांक १३ भुशी-रामनगर (लोकसंख्या ६ हजार ३७३) हा प्रभाग सर्वांत मोठा, तर प्रभाग क्रमांक नऊ लोणावळा गावठाण (लोकसंख्या ३ हजार ६३६) सर्वांत लहान ठरला आहे. वलवण (प्रभाग ३), वलवण-नांगरगाव (प्रभाग ५), लोणावळा बाजार (प्रभाग ८), लोणावळा गावठाण (प्रभाग ९) मधील एक जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) तर खंडाळा (प्रभाग ११) मधील एक जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव राहण्याची शक्यता असून आता आरक्षणांकडे लक्ष लागले आहे.
प्रारूप प्रभागरचना अशी...
प्रभाग १ : न्यू तुंगार्ली - इंदिरानगर, गोल्ड व्हॅली, आंबेडकर नगर, गुरुकुल हायस्कूल परिसर, डॉन बॉस्को हायस्कूल परिसर
प्रभाग २ : तुंगार्ली गावठाण - तुंगार्ली गावठाण, पांगोळी, कैवल्यधाम, नारायणी धाम, बद्रीविशाल सोसायटी, सिल्व्हर व्हॅली सोसायटी
प्रभाग ३ : वलवण - वलवण गाव, समतानगर, बऱ्हाणपूर, जिजामातानगर, हॉटेल ऑर्किड ते वलवन डॅम पर्यंतची टाटा डक्टलाईनपर्यंतची हद्द
प्रभाग ४ : रेल्वे विभाग- रेल्वे गेस्ट हाऊस, डेणखर कॉलनी, कालेकर मळा, रेल्वे परिसर, स्वराज्यनगर, बारा बंगला, रेल्वे इन्स्टिट्यूट परिसर
प्रभाग ५ " नांगरगाव- नांगरगाव गावठाण, लोणावळा औद्योगिक वसाहत, निशिगंधा हौसिंग सोसायटी
प्रभाग ६ : भांगरवाडी - भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे गेट ते प्रस्तावित उड्डाणपूल ते गोळपकर घराजवळील रस्ता ते वाबळे घर ते शेलार घर कुसगाव हद्दीपर्यंत दामोदर कॉलनी रोड, धुपछाव बिल्डींग ते डफळ घरापर्यंत कुसगाव रस्ता, रेल्वे गेट ३२ ते संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा ते घमंडे बिल्डींग ते तावरे सदन, मातृछाया बिल्डींग, अनुजा अपार्टमेंट ने पार्क व्ह्यू, लोहगड उद्यान चौक ते चव्हाण कॉर्नर
प्रभाग ७ : भांगरवाडी विभाग २ - भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे गेट ते रेल्वेलाइन, इंद्रायणी नदीपर्यंत, भांगरवाडी नांगरगाव रेल्वे गेट ते राममंदिर ते दामोदर कॉलनी रोड, धुपछाव बिल्डींग ते कुसगाव रस्ता, डफळ इमारत, इंद्रायणी नदी ते कुसगावपर्यंतचा रस्ता, इंद्रायणी नदी
प्रभाग ८ : लोणावळा बाजार- हुडको, इंद्रायणीनगर, बाजारपेठ, नगरपरिषद कार्यालय, महात्मा फुले भाजी मंडई, रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नं. १ ते इंद्रायणी नदी, महात्मा गांधी रस्ता रेल्वे हद्दीने, महात्मा फुले भाजी मंडई ते डॉ. रानडे हॉस्पिटल ते पडवळ देशीदारू दुकान ते इंद्रायणी नदी
प्रभाग ९ : लोणावळा गावठाण-संत रोहिदासनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, गावठाण, मशीद परिसर, महात्मा फुले भाजी मंडई ते लुणावत सॉ मिल ते वजीही सोसायटी, वर्धमान सोसायटीच्या कडेने, वर्धमान सोसायटी ते पीडब्ल्यूडी ऑफिस परिसर ते कालिका मंदिर ते गावठाण रस्त्याने भैरवनाथ मंदिर ते नागन गवळी घर ते मार्कर मंजिल
प्रभाग १० : गवळीवाडा- लोणावळा नगरपरिषदेची मौजे कुणे नामापर्यंतची हद्द, सर्व्हे नं. २१, तुंगार्ली ते अरविंद शाह जवळचा नाला, अरविंद शहा बंगला ते न्यू तुंगार्ली रोड ने कोटक
बंगल्याजवळील नाला ते किरण पेट्रोल पंप ते व्हीपीएस शाळेजवळील जवळील फूट ओव्हर बीज, कोटकर सॅनेटोरियम ते सर्वोदय नर्सरी, जुना हायवे ते शंकर मंदिरापर्यंतचा रस्ता
प्रभाग ११ : खंडाळा - नेताजीवाडी, बॅटरी हिल, केळपेठ, खंडाळा गावठाण, विकास व्हॅली, हिलटॉप कॉलनी
प्रभाग १२ : जुना खंडाळा - रायवूड, खोंडगेवाडी, भैरवनाथ मंदिर परिसर, जुना खंडाळा परिसर, वर्धमान सोसायटी परिसर
प्रभाग १३ : भुशी रामनगर - भुशी, रामनगर, ठोंबरेवाडी, रस्टीक हायलॅन्ड, सर्वे नं.३०, हनुमान टेकडी, इंदिरानगर, जुना खंडाळा, लोणावळा धरण
हेही वाचा: भक्ष्याच्या शोधातच बिबटे हिंजवडी आयटीत
तळेगाव नगर परिषद
तळेगाव स्टेशन : जाहीर प्रारूप प्रभागरचनेत तळेगाव स्टेशन विभागातील प्रभाग क्रमांक-२ यशवंतनगर (लोकसंख्या ४,४३७) सर्वांत मोठा प्रभाग, तर त्याखालोखाल प्रभाग क्रमांक ४ आनंदनगर, मनोहरनगर (लोकसंख्या ४,२६६) मोठा ठरला आहे. शहराची लोकसंख्या ५६ हजार ४३५ असून १४ प्रभाग झाले आहेत.
प्रारूप प्रभागरचना अशी...
प्रभाग १ : कल्पना सोसायटी, बालाजी मंदिर, बायो डायव्हर्सिटी पार्क, इंद्रायणी इंग्लिश मेडियम स्कूल,यशवंतनगर
प्रभाग २ : इंद्रायणी गार्डन, नम्रता आयकॉनिक सोसायटी, मायमर क्लिनिकल लॅब, नाना भालेराव कॉलनी, राधा-कृष्ण मंदिर, स्वामी कुंज अपार्टमेंट, सारस्वत बँक, साई पूजा अपार्टमेंट
प्रभाग ३ : व्हीटीपी भाग्यस्थान, आरएमके नेचर्स क्लासिक, स्नेहदत्त हॉस्पिटल, बनसोडे हॉस्पिटल, इंद्रायणी महाविद्यालय, डॉ.खान रिसर्च सेंटर, सत्यकमल कॉलनी, योजनानगर
प्रभाग ४ : सिद्धिविनायक गणेश मंदिर, कृष्णराव भेगडे स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, आनंदनगर, मनोहरनगर
प्रभाग ५ : जीरावाला पार्श्वनाथ जैन मंदिर, तळेगाव नगरपरिषद, आदर्श विद्या मंदिर, शांताई सिटी सेंटर, लिटील हर्ट सोसायटी, अमरहिंद मित्र मंडळ
प्रभाग ६ : राजगुरव कॉलनी, बॅलाडोर सोसायटी, फन स्केअर मल्टिप्लेक्स, शिक्षक सोसायटी
प्रभाग ७ : तळेगाव रेल्वे स्टेशन, सेवाधाम हॉस्पिटल, गवत बाजार, हरणेश्वर हॉस्पिटल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान, हॉटेल मयूरेश, मावळ लॅँड, अल्टीनो कॉलनी
प्रभाग ८ : पूर्वा गार्डन, लेक पॅराडाईज, लॅटीन सोसायटी, नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय, लेक कॅसल, गावतळे, मंत्रा सिटी, १०० केव्ही एमएसईबी, निलया सोसायटी, सह्याद्री स्कूल, फ्लोरा सिटी
प्रभाग ९ : कलापिनी रंग मंदिर, सवेरा बेकरी, कडोलकर कॉलनी, लायन्स क्लब, इमेज प्लाझा, वर्धमान रेसिडेन्सी, नवमी हॉटेल, नाना-नानी पार्क
प्रभाग १० : एंजल हिल्स, खंडोबा मंदिर, हॉटेल मनजित,भगिनी निवेदिता बँक
प्रभाग ११ : श्री छत्रपती शिवाजी महाराज चित्रपटगृह, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, बाजारपेठ मशीद, पंकज मेटल शॉप
प्रभाग १२ : बनेश्वर मंदिर, डोळसनाथ मंदिर, ज्ञानेश्वर नगर, सिल्व्हर व्हॅली, सिक्स विसेश, बामनडोह, घोरावडी रेल्वे स्टेशन
प्रभाग १३ : नॅशनल हेवी, आकार फौंड्री, तळेगाव दाभाडे संस्कृती तलाव
प्रभाग १४ : मोहोर प्रतिमा,जैन इंग्लिश स्कूल, गजानन महाराज मंदिर, राव कॉलनी, तळेगाव पोलिस ठाणे, थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळा, नगरपरिषद क्रीडा संकुल, योगिराज हॉल, प्रथम रेसिडेन्सी, संस्कृती सोसायटी
Web Title: Lonavala Talegaon Ward Structure Declare
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..