
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या जवळपास २७ लाख ७६ हजार वाहनांवर दंड ठोठावण्यात आला आहे. यात तब्बल ४७० कोटी रुपयांचे ई-चलन जारी करण्यात आले आहे. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या (आयटीएमस) मदतीने गेल्या वर्षभरात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दंडापैकी ५१ कोटी ३२ लाखांची वसुली झाली आहे.