धक्कादायक! लोणावळ्यातील नौदल प्रशिक्षण केंद्रात तिसऱ्या दिवशीही आढळले कोरोनाबाधित

टीम ई-सकाळ
Monday, 22 June 2020

लोणावळ्यातील नौदल प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

लोणावळा : लोणावळ्यातील नौदल प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी केंद्रात दाखल आणखी तिघा प्रशिक्षणार्थी जवानांचे कोरोना अहवाल सोमवारी (ता.२२) पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना बाधितांची संख्या आता सातवर पोचली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मुळचे हरियाना, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथील वीस वर्षीय प्रशिक्षणार्थी जवान बुधवारी (ता. १०) प्रशिक्षणासाठी आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्ये दाखल झाले होते. त्यांना कॅम्पसमध्येच क्वारंटाइन करण्यात आले होते. सदर जवानांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले. दरम्यान, सोमवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी वानवडी येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारीही उत्तरप्रदेश येथील एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर शनिवारी (ता.२०) उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन प्रशिक्षणार्थी जवान कोरोना संक्रमित आढळले होते. संक्रमित प्रशिक्षणार्थी जवान वास्तव्यास असलेली इमारत कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आली असून, आयएनएस शिवाजीचा पुर्ण परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonavla: Corona positive found in INS Shivaji on third day