लम्पीच्या तोंडावर मृत जनावरेची उघड्यावर; परिसरात दुर्गंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death Animal

लम्पी या आजाराचा फैलाव जनावरांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये भोसरी-बालनगरी परिसरात मृत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला.

लम्पीच्या तोंडावर मृत जनावरेची उघड्यावर; परिसरात दुर्गंधी

पिंपरी - लम्पी या आजाराचा फैलाव जनावरांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये भोसरी-बालनगरी परिसरात मृत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचा प्रकार आज (ता. २३) उघडकीस आला आहे. परिणामी, मृत जनावरे उघड्यावर पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. याप्रकरणी धास्तावलेल्या प्रशासनाने संबंधित ठेका घेतलेल्या कंपनीला नोटीस बजावली असून या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम आता युद्ध पातळीवर पूर्ण केल्याचा दावा पशूवैद्यकिय विभागाने केला आहे.

देशभरात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनावरांना लम्पीची लागण होत आहे. या रोगामुळे जनावरांचा मृत्यू होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या ३ हजार ५०० आहे. आतापर्यंत ८ लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळले आहेत. लम्पी आजारामुळे खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना शहरात मृत जनावरांची उघड्यावर विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृत जनावरांची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही. मृत घोडा आणि गाय जनावरे अस्तावस्थ पडले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणी माहिती मिळताच उपायुक्त सचिन ढोले व पशुवैद्यकीय अधिकारी अरूण दगडे यांनी जागेची पाहणी केली. त्याच्‍या पाहणीअंती ढोले म्हणाले, ‘८ ते १० फूट खोलीचा खड्डा खोदून त्यामध्ये मृत जनावराचा पाठीचा कणा जमिनीवर राहील व चारही पाय वर असतील अशा पद्धतीने पुरावे लागते. पण संबंधित एजन्सीकडून गलथान कारभार केल्यामुळे १० ते १२ जनावरे व्यवस्थित दफन केले नसल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे ही जनावरे उघड्यावर पडली आहेत. जेसीबीच्या माध्यमातून खड्डा खोदून मृत जनावरांना पुन्हा दफन करण्यात आले.

‘शहरातील मृत जनावरे पुरविण्याचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. या एजन्सीने जनावरे पुरविण्याचे काम व्यवस्थित केले नाही. पावसामुळे माती वाहून गेल्याने पुरलेली जनावरे अस्तावस्थ झाले आहेत. याबाबत एजन्सीला नोटीस दिली आहे. मृत जनावरे व्यवस्थित पुरण्याचे आदेश दिले आहेत. वेळप्रसंगी संबंधित एजन्सीला दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मृत जनावरांमध्ये एकही लम्पी बाधित जनावर नाहीत.’

- सचिन ढोले, उपायुक्त पशुवैद्यकीय विभाग

Web Title: Lumpy Skin Dead Animals Bad Smell In The Area Pimpri Chinchwad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..