esakal | पिंपरी : मुस्लिम बांधवांकडून हाथरस घटनेचा निषेध; घोषणा देऊन केला आक्रोश व्यक्त
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : मुस्लिम बांधवांकडून हाथरस घटनेचा निषेध; घोषणा देऊन केला आक्रोश व्यक्त

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट व महाराष्ट्र विकास समितीतर्फे हाथरस येथील घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध करण्यात आला.

पिंपरी : मुस्लिम बांधवांकडून हाथरस घटनेचा निषेध; घोषणा देऊन केला आक्रोश व्यक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट व महाराष्ट्र विकास समितीतर्फे हाथरस येथील घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध करण्यात आला. 'हम सब एक है,' 'इनक्‍लाब जिंदाबाद', 'जस्टीस फॉर मनिषा', अशा घोषणा मुस्लिम बांधवांनी दिल्या.

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

ऍड मोहम्मद तारिक रिजवी म्हणाले, "संविधान काय सांगते याची कोणालाही काही पर्वा राहिली नाही. गरीब जनतेचा हा हिंदुस्थान आहे. संविधान हा सर्वांचा ताज आहे. त्याचा अवमान आम्ही होऊ देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'वुई द पीपल ऑफ' इंडिया म्हटले आहे, त्यानुसार आम्ही चालणार. यापुढील काळात योगी सरकारचे काही खरे नाही. मोदी सरकारही सध्या हवेत आहे. राहुल गांधी परिवाराला धक्काबुक्की केली हे अपमानास्पद आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचाही धिक्कार आहे. या घटनेला अद्यापही सरकारने योग्य पद्धतीने हाताळले नाही." अर्णब गोस्वामींचाही रिजवी यांनी निषेध केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहाबुद्दीन एम शेख म्हणाले, "जातीसोबत कोणताही संबंध आम्ही जोडणार नाही. अशा अत्याचारी घटनांचा निर्णय घेण्यास विलंब करण्यात येत आहे. मात्र, न्याय मिळण्यास विलंब होत आहे. त्यानंतरही अत्याचार झालाच नाही, अशा प्रकारे आव आणला जात आहे. लोकशाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन चालणार नाही."

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महाराष्ट्र विकास समितीचे अध्यक्ष डॉ. सोलामन भंडारी, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे प्रदेश संघटनेचे कार्याध्यक्ष शाहाबुद्दीन एम. शेख, पुणे जिल्हा अध्यक्षा हाजरा कबीर, पुणे शहराध्यक्ष जफर खान, शहराध्यक्षा अफसा अन्सारी, पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते ऍड. मोहम्मद तारिक रिजवी, कोर कमिटी सदस्य व्ही.एम. कबीर, शहर उपाध्यक्ष कमरूनिसा शेख, पासटर बन्यामिन काळे, संजीवनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इम्रान बेग, फिरोज शेख, पकंज तंतरपले, कांतीलाल जैन, नईम मुल्ला, सचिन गवारे, डेविड काळे, शाहुल हमिद उपस्थित होते. महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदिम मुजावर व प्रमुख सल्लागार राजेंद्र सिंह वालीया यांनी निषेध आंदोलन आयोजन केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा