आयटी नगरी हिंजवडीला संपाचा फटका, २४ तास अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity workers strike

महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारकेल्या संपाचा फटका आयटी नगरी हिंजवडीलाही फटका बसला आहे.

Mahavitaran Strike : आयटी नगरी हिंजवडीला संपाचा फटका, २४ तास अंधारात

हिंजवडी - महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारकेल्या संपाचा फटका आयटी नगरी हिंजवडीलाही फटका बसला आहे. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात ट्रान्सफार्मरमध्ये स्फोट झाला. मात्र, ते दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने निम्मी हिंजवडी मंगळवार (ता. ३) पासून २४ तास अंधारात आहे. २४ तासांहून अधिक काळ वीज नसल्याने सर्व सामान्य नागरिक व व्यवसायिकांची मोठी गैरसोय सुरू आहे.

हिंजवडीतील लक्ष्मी चौक, कीर्ती गेट, एम आरएफ शोरूम मागील परिसर, मुकाई नगर या मोठ्या पट्टयात वीज गुल झाली आहे. या भागात मोठी डेव्हलपमेंट झाली असून, लहान मोठी सुमारे हजार घरे व २५ हजाराहून अधिक लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे एवढ्या मोठया परिसरातील रहिवाशी हतबल झाले असून मंगळवारपासून बॅटरी बॅकअप जनरेटर व इतर उपकरनांवर अवलंबून आहेत. याबाबत हिंजवडी विभागाचे उपअभियंता पठाण यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ताथवडे मधील अक्षरा ऐलेमेंटा या नऊशे सदनिकांच्या सोसायटीत बुधवारी (ता. ४) सकाळी ९ वाजता तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित झाली होती. अनेकदा तक्रार करूनही महावितरण कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही तसेच कार्यालयात गेलो असता केवळ दोनच कर्मचारी असल्याचे रहिवाशी प्रविण फराड यांनी सांगितले. या सोसायटीची वीज सायंकाळी सहा वाजता पूर्ववत झाली. यासह वाकडमधील काही सोसायट्यात विजेचा लपंडाव सुरू होता.