esakal | दोन वर्षांची माही सांगते मराठी-इंग्रजी अंकासह थोर नेत्यांची नावे
sakal

बोलून बातमी शोधा

Mahi Kakade

वय अवघे 2 वर्ष; अंक, प्राणी-पक्षी, कविता, नेते सगळं तोंडपाठ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोसरी - पुढील महिन्यात दोन वर्षांची होणारी माही... (Mahi Kakade) भारतातील राज्यांच्या राजधान्यांची नावे, मराठी-इंग्रजी अंक, प्राणी-पक्ष्यांची नावे सांगते, कविता म्हणते. त्याचबरोबर भारतीय (India) थोर नेत्यांची (Great Leader) नावे सांगते. तसेच योगा (Yoga) करते व दिशांची (Direction) नावे सांगते. आणखीही बऱ्याच गोष्टी सांगत मोठ्यांनाही तोंडात बोटे घालायला लावते...त्यामुळेच दिघीत राहणारी माही महादेव काकडे ही बालिका आई-वडिलांसह इतरांनाही अचंबित करत आहे. (Mahi Kakade Small Girl Clever)

खेळ वर्गात (प्ले ग्रुप) टाकण्याचे वय कमीतकमी अडीच वर्षाचे आहे. मात्र, माही घरी राहूनच देशाचे राष्ट्रपिता, भारतीय घटनेचे शिल्पकार आदींसह इतर थोर पुरुषांच्या नावाबरोबरच देशाचे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपतींसह इतर नेत्यांची नावे सांगते. राज्यांच्या राजधान्या अचूक सांगते. आठवड्यातील वार, इंग्रजी महिन्यांची नाव सांगते. १-२० पर्यंतचे मराठी-इंग्रजी अंक म्हणते. चित्रावरून प्राणी-पक्षी, फळे-भाजी ओळखून नावे सांगते. तसेच आवाजावरून प्राण्यांची नावे सांगते. आकारावरून प्राणी खाच्यात बसविणे हा खेळ तीन-ते सहा वर्षांच्या मुलांसाठी असतानाही माही प्राणीबरोबर त्या-त्या साच्यात बसविते. वाहनांची नावे सांगते. कविता, गाणी म्हणते. ती तिच्या आजींसह आई, वडील, बहिणीचे नाव सांगते. इंग्रजी अक्षरे म्हणते. साखर, कारले, मिरची, लिंबू आदींची चव सांगते. त्याचप्रमाणे क्रिकेट खेळते, योगा करते, लिंबू-चमचा खेळते विशेष म्हणजे छोट्या मण्यांमध्ये सुईद्वारे धागाही ओवते.

हेही वाचा: वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळ्यात कारवाई!

माहीची मोठी बहिण काव्या सात वर्षांची आहे. तिचा अभ्यास घेताना, तिला सांगितलेल्या गोष्टी माहिती सांगत असल्याचे व लक्षात ठेवत असल्याचे समजले. त्यामुळे तिला आणखी इतर गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ती सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवते व नंतर विचारल्यावर सांगत असल्याचे लक्षात आले. तेव्हा तिला इतर गोष्टी शिकविल्या. त्याही ती अचूकपणे सांगते.

- ज्ञानेश्वरी व महादेव काकडे, आई-वडील

दोन वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये एकाग्रता कमी असते. माही ऐकलेल्या गोष्टी लक्षात ठेवून सांगते, त्यामुळे तिचा बुद्ध्यांक इतर लहान मुलांपेक्षा निश्चितच चांगला आहे. त्याचप्रमाणे तिचे मानसिक वयही तीन-साडेतीन वर्षांपर्यंतचे असू शकते.

- डॅा. माधव चव्हाण, बालरोगतज्ज्ञ, काळेवाडी.

loading image