esakal | वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळ्यात कारवाई!
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळ्यात कारवाई!

पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळ्यात कारवाई!

sakal_logo
By
भाऊ म्हाळस्कर

लोणावळा (पुणे) : कोरोनामुळे पर्यटनावर बंदी आहे. मात्र, लोणावळा, खंडाळ्यात नियम धाब्यावर बसवित वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. (police taken action against tourists in lonavala-khandala)

वीकेंडला पर्यटनासाठी आलेल्या अतिउत्साही पर्यटकांना येथील पर्यटनस्थळांवर रविवारी (ता. 13) मज्जाव करण्यात येत माघारी धाडण्यात आले. लोणावळा परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. येथील नद्या-नाले, डोंगरदऱ्यांतील धबधबे खळाळून वाहू लागले आहे. निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी गेले काही दिवस लोणावळा, खंडाळ्यासह पवना परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचा धोका अजूनही कायम असताना कोरोनाचा विसर पडल्याचेच चित्र निर्माण झाले होते. शनिवारी व रविवारी लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, भुशी परिसर, बोरघाट, खंडाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने मार्गावर लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. येथील रिसॉर्ट व खासगी बंगल्यांमध्ये पर्यटकांचे वास्तव्य आहे.

हेही वाचा: परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना लसीकरणाच्या ‘तांत्रिक’ गोंधळाचा अडसर

दरम्यान, कोरोना संसर्गाची भीती अद्यापही कायम असल्याने पर्यटकांच्या वाढती गर्दीमूळे चिंता व्यक्त होत होती. वीकेंडला लोणावळा शहरात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे रविवारी कडक पावले उचलण्यात आली. लोणावळा ते अॅंम्बी व्हॅली रस्त्यावर भुशी व लायन्स पॉइंटकडे जाणारी वाहने सकाळपासूनच नौसेना बाग, रायवूड येथे पोलिसांतर्फे रोखण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी माघारी धाडले. काही पर्यटकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने महामार्गावरील वरसोली टोलनाका येथे कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी सुसज्ज ‘प्ले रूम’

पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोनासंदर्भात निर्बंधामध्ये अद्यापही शिथिलता आणलेली नाही. कोरोनाची साथ अजून आटोक्यात आलेली नसून पुण्या-मंबईहून मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात विनाकारण गर्दी करत आहे. पोलिसांच्या वतीने त्यांना समजावून सांगण्यात येत असून, दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

loading image