esakal | #PuneRains : मोशी परिसरात पिकांचे मोठे नुकसान 
sakal

बोलून बातमी शोधा

#PuneRains : मोशी परिसरात पिकांचे मोठे नुकसान 

पावसामुळे मोशी, जाधववाडी, चिखली, डुडुळगाव, वहिलेनगर, तापकीर वस्ती, सस्तेवाडी आदी उपनगर परिसरात पाणी साचले.

#PuneRains : मोशी परिसरात पिकांचे मोठे नुकसान 

sakal_logo
By
श्रावण जाधव

मोशी : "कांदा, टोमॅटो, वांगी, सोयाबीन या फळभाज्यांबरोबरच मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर या पालेभाज्यांचे पावसामुळे नुकसान झाले. एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये माती वाहून गेली. त्यामुळे शेतामध्ये खड्डे पडले असून, पाणी साचले आहे. या पावसामुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे," असे मोशी-बोऱ्हाडेवाडीतील शेतकरी रवींद्र बोराडे यांनी सांगितले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी (ता. 14) रात्री झालेल्या पावसामुळे मोशी, जाधववाडी, चिखली, डुडुळगाव, वहिलेनगर, तापकीर वस्ती, सस्तेवाडी आदी उपनगर परिसरात पाणी साचले. तसेच मोशी प्राधिकरण परिसरात काही काळ वीजही गेली होती.

या भागातील शेतीचे नुकसान

मोशीतील बोऱ्हाडेवाडी, आल्हाट वस्ती, सस्तेवाडी, बनकरवाडी, डुडुळगाव, वहिलेनगर, मोशी-देहू रस्ता, मोशी-आळंदी या बीआरटी रस्त्यालगत गायकवाड खोरा, कुदळे वस्ती, आल्हाटवाडी, हवालदार वस्ती. 

या पिकांचे नुकसान  

मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या; कांदा, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर यांसारख्या फळभाज्या; भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका, सोयाबीन; तर काही शेतकऱ्यांच्या पपई, टरबूज, कलिंगड यांसारख्या फळ शेतीचेही नुकसान झाले आहे. 

या भागातील रस्त्यांवर साचले पाणी 

मोशी गावठाण, मोशी-देहू, मोशी-आळंदी बीआरटी रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 4, 6, 9 मधील अंतर्गत रस्त्यांसह अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने तळे साचले होते.

या सोसायटीचे नुकसान 

पुणे-नाशिक महामार्गावरील दि अॅड्रेस या गृहनिर्माण सोसायटीची सीमा भिंत कोसळून चार वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

या पावसाळ्यात जेवढा पाऊस झाला नाही, तेवढा पाऊस रात्री चार तासांत झाला. काढणीवर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसान भरपाई देणे अत्यावश्यक आहे. 

- रविंद्र बोऱ्हाडे, शेतकरी, मोशी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या आमच्या दि अॅड्रेस सोसाटीची सीमाभिंत पावसामुळे पडली. सीमाभिंतीलगत लावलेल्या चार वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

- संतोष बोराटे, रहिवाशी, दि अॅड्रेस सोसायटी, मोशी