मंदाताई नाईक यांना सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्रीचा पुरस्कार  

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

मंदाताई या वडगाव येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक मोरेश्वर ऊर्फ तात्याराव बवरे व दिवंगत समाजसेविका इंदूताई बवरे यांच्या सुकन्या. त्या पुण्यात वास्तव्यास आहेत.

वडगाव मावळ (पुणे) : वडगावची लेक असलेल्या व वयाच्या पंचाहत्तरीत पोचलेल्या मंदाताई उदयराव नाईक यांनी स्वतःला काळाबरोबर बदलवत आजच्या स्मार्टफोनच्या जगात त्रिमूर्ती फिल्म्स, पुणे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन शॉर्ट फिल्म महोत्सव- २०२० मधील स्पर्धेत 'कलादर्शन' या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय करून सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्रीचा निरुपमा रॉय स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मंदाताई या वडगाव येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक मोरेश्वर ऊर्फ तात्याराव बवरे व दिवंगत समाजसेविका इंदूताई बवरे यांच्या सुकन्या. त्या पुण्यात वास्तव्यास आहेत. माहेरकडील समाजसेवेचा वसा त्यांनी सासरी गेल्यावरही सुरु ठेवला. समाजकार्याबरोबरच उत्तम लेखिका, कवयित्री, कथाकथन, बालगोपालांसाठी ऑडिओवर बालगीते, कविता, गोष्टी सादरीकरण 
असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. 

हेही वाचा- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा 'हा 'पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या आजूबाजूला दररोज प्रत्येक क्षणी काही ना काही घटना घडत असते, त्या आधारे एखादी शॉर्ट फिल्म तयार करून अंगी असलेल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी त्रिमूर्ती फिल्म्सने पहिल्या ऑनलाइन शॉर्टफिल्म महोत्सव-२०२० आयोजित केला होता. वयाच्या पंचाहत्तरीत पोचलेल्या मंदाताईंनी काळाबरोबर राहून या स्पर्धेत कलादर्शन या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय केला. सध्याच्या लॉकडाउनची परिस्थिती व त्या अनुषंगाने लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असा या फिल्मचा आशय होता. त्यात मंदाताईंना सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्रीचा निरुपमा रॉय स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandatai Naik won the Best Character Actress award